Type Here to Get Search Results !

शहादा | प्रकाशा पाणी पुरवठा योजनेअंतर्गत भुमीपुजनच्या वेळी प्राचीन काळ्या पाषाणाची अखंडित मुर्ती सापडली



शहादा तालुक्यातील प्रकाशा पाणी पुरवठा योजनेअंतर्गत भुमीपुजनच्या वेळी पाया खोद काम करत असतांना प्रकाशा गावाचा नागबरडा येथे प्राचीन काळ्या पाषाणाची अखंडित मुर्ती आढळली, पहाण्यासाठी ग्रामस्थांनी गर्दी केली होती,

 सनातन संस्कृतीचे ऐतिहासिक महत्व असलेले दक्षिण काशी प्रकाशा ता शहादा जि नंदुरबार येथे नेहमी अश्या स्वरुपाच्या सनातन हिंदु संस्कृतीचा पुरावे वेळोवेळी आढळून येत असतात. सन २०१९ साली देखील म्हैसासुरमर्दनीची हेमाडपंती सुमारे ३००० हजार वर्ष जुनी मुर्ती हस्तगत झाली होती. कार्बनडेटिंग च्या आधारावर ASI च्या वैज्ञानिक शोधा अंती असे निष्पन्न झाले होते. ति मुर्ती आता धुळे येथे राजवाडे संशोधन मंडळ येथे ठेवण्यात आली आहे. आजही अशिच अनुभूती गावकर्यांना आली ह्या मुर्तीची ऐतिहासिक शोध करावयाचा असेल तर आपल्या गावाचा अचुक ईतिहास समजायला मदत होईल. भारतिय पुरातत्त्व विभागाच्या दिल्ली स्थित अधिकार्यांशी संपर्क केला व त्यांनी देखील उस्पुर्त प्रतिसाद दिला, जर गावकऱ्यांकडून ना हरकत असेल तर आम्हि येतो अशी ग्वाही त्यांनी दिली. हि मुर्ती भारताच्या नैशनल म्युझिअम दिल्ली येथे सास्थानापन्न होईल. जेथे जगातील सर्व नागरिक येत असतात. व प्रकाशा गावाची सनातन संस्कृती ही किती हजार वर्षापूर्वीची आहे हे देखिल सिद्द होईल.व ह्या परिसराला एक आगळे वेगळे महत्व प्राप्त होऊन स्थानिक विकास पर्यटनाच्या दृष्टीने सर्वांगीण महत्ती देउन भविष्यात एक महत्त्वपूर्ण स्थान म्हणून प्रकाशा ची ओळख जगाच्या पाठिवर अधोरेखित होईल. हे माझे मत, जयगणेश पाटील प्राकाशा यांनी व्यक्त केले आहे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad