प्रभा हिरा गांधी वडोली हायस्कूल येथे आंतरराष्ट्रीय मानवाधिकार दिवस साजरा
पालघर जिल्हा प्रतिनिधी :- सुनिल जाबर
जव्हार तालुक्यातील प्रभा हिरा गांधी वडोली हायस्कूल वडोली येथे दरवर्षी 10 डिसेंबर UDHR वर्धापनंदिन हा राष्टीय मानवाधिकार दिवस म्हणून साजरा केला जातो.1948 संयुक्त राष्टसंघाकडून पुरस्काराची सुरवात. व मानव अधिकार संरक्षण अधिनियम 1993, मानव अधिकारांर्गत मुख्यता जीवन आणी स्वातंत्र्याचा अधिकार, गुलामी आणी यातनांमधून मुक्तीचा अधिकार, अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार, काम आणी शिक्षणाचा अधिकार इ. गोष्टी समाविष्ट आहेत. कोणतीही व्यक्ती बिना भेदभाव करता या अधिकारांना प्राप्त करण्याची अधिकारी आहे.
या मानव अधिकार दिनाचे औचित्य साधून सार्वत्रिक निवडणूक-2022 मध्येव निवडुन आलेले नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच व सदस्य यांचा जाहिर सत्कार कार्यक्रमाचा आयोजन केले होते. यावेळी वडोली ग्रामपंचायतचे सरपंच कामिनी दिपक गावंढा, उपसरपंच रघुनाथ विणू भोये, सदस्य-निशा भोये, कल्पना भोये. कोगदा सरपंच मथुरा राजेश भसरा व इतर सदस्य उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरवात पाहुण्यांच्या स्वागताने केली तर यावेळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष अशोक सखाराम भसरा, उपाध्यक्ष-शशिकला विलास चौधरी व इतर सदस्य यांच्या हातून शाल-श्रीफळ देऊन सत्कर केला यावेळी सरपंच कामिनी दिपक गावंढा यांनी शाळेतील मुलांना मानव अधिकार विषयी मुलांना मार्गदर्शन केले. शाळेचे मुख्याध्यापक थोरात सर,भोरे सर, वाघ सर व इतर शिक्षक वृंद उपस्थित आंतरराष्ट्रीय मानवाधिकार दिवस साजरा करण्यात आला.