पत्रकार संरक्षण समिती महाराष्ट्र यांची कार्यकरणी बैठक जव्हार येथे संपन्न
पालघर जिल्हा प्रतिनिधी :- सुनिल जाबर
पत्रकार संरक्षण समिती संस्थापक महाराष्ट्र राज्य मार्गदर्शक आदरणीय पत्र साहेब तसेच राम खुर्दळ साहेब यांच्या सहकार्याने जव्हार येथे कार्यकारणी बैठक पालघर जिल्ह्यातील हुशार तडफदार पत्रकार संरक्षण समिती जिल्हाध्यक्ष माननीय श्री मनोज कामडी साहेब यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली.
यावेळी नवीन कार्यकारणी ची निवड करण्यात आली पालघर जिल्हा उपाध्यक्ष पदी सोमनाथ टोकरे,सचिव पदी हेमंत घाटाळ,संघटक पदी प्रदीप कामडी व जव्हार तालुका अध्यक्ष पदी प्रमोद मौळे,उपाध्यक्ष पदी सुनिल जाबर ,विक्रमगड तालुका अध्यक्ष पदी दीपक भोये,सचिव पदी प्रशांत दाहवाड यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.उपस्थित पत्रकार बांधव यांनी ग्रामीण पत्रकारांच्या समस्या विषयी चर्चा केली यावेळी पालघर जिल्हाध्यक्ष मनोज कामडी यांनी उपस्थित सर्वांना पत्रकार संरक्षण समिती उद्देश व कार्यपद्धती,नविन सदस्य नोंदणी विषयी मार्गदर्शन केले.