नंदूरबार जिल्ह्यातील आदिवासी युवा कवी संतोष पावरा यांच्या ढोल कविता संग्रहाची तिसरी आवृत्तीचे प्रकाशन
नुकतेच पुणे येथे 14 वे विद्रोही साहित्य संस्कृती संमेलन मोठ्या उत्साहात पार पडत आहे. या संमेलनात नंदूरबार जिल्ह्यातील आदिवासी युवा कवी संतोष पावरा यांच्या ढोल कविता संग्रहाची तिसरी आवृत्त संमेलनाचे अध्यक्ष डॉ भारत पाटणकर यांच्या हस्ते प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत प्रकाशित करण्यात आले. संमेलनात विविध राज्यांतून मोठ्या संख्येने रसिक , कवी, विचारवंत कार्यकर्ते, मार्गदर्शक पहिल्या दिवशी उपस्थित होते.
या वेळी सर्व दूर परिचित आहे. पुणे सारख्या शहरात गेर नेत्याचा लोकांना गेर नृत्याचा आस्वाद घेता आला. संमेलनात लोकशाही व्यवस्था, संविधान, साहित्य, मानवता, निसर्ग, कला अश्या विविध विषयांवर चर्चा परिसंवाद चर्चा करण्यात आले.
महात्मा फुले वाडा येथून मोठ्या दिमाखात, विविध देखाव्यात विद्रोहाचा घोषणा देत, विविध नृत्य पथकांसह मिरवणूक राष्ट्र सेवा दल परिसरात कार्यक्रमाच्या मुख्य ठिकाणी आले.
(सातपुड्यातील लक्कडकोट येथील गेर नृत्य संमेलनात सहभागी होते. ' गेर नृत्य ' हा आदिवासींच्या होळी सणातील आदिवासी नृत्य आहे. यात ढोल, मांदल, थाळी, पावी , तुतडी अशी आदिवासींचे पारंपारिक वाद्य असतात. पुरुष विविध वेश परिधान करून नृत्यात सहभागी होतात. त्यात तलवार घेऊन पुरुष नाचतात त्यांना गेर ' म्हटले जाते तर पुरुष महिलेच्या वेशात नाचतात त्यांना ' राय ' म्हटले जाते. काली, निसक्या, जिम्र्या अशी विविध भूमिकेत हे गेर नृत्य सातपुड्यातील आदिवासिंचे महत्वाचे नृत्य आहे. आज मोठ्या प्रमाणावर हे गेर नृत्य गावागावांतून नामशेष होत आहे याचे दुःख वाटते.खंत
-युवा कवी साहित्यिक संतोष पावरा नंदुरबार यांनी व्यक्त केली