नेमसुशिल शैक्षणिक समूहात शालेय विज्ञान प्रदर्शन
तळोदा :- शहरातील नेमसुशिल शैक्षणिक समूहात शालेय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले.प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून आर.बी.आय सेवानिवृत्त अधिकारी दिपकभाई बावीसी भावनाबेन बावीसी उपाध्यक्ष डी एम महाले उपस्थित होते मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून उद्घाटन करण्यात आले
यावेळी विद्यार्थ्यांनी आरोग्य व स्वच्छता पर्यावरण व अनुकूल सामग्री सॉफ्टवेअर अँड ऍप्स वाहतूक आणि परिवहन गणितीय मॉडलिंग अशा विविध विषयांवर उपकरणांची मांडणी करण्यात आली प्रदर्शन पाहण्यासाठी शहरातील शाळा व पालकांनी भेटी दिल्या व माहिती जाणून घेतली तज्ञ परिक्षक म्हणून कामिनी पवार चेतन पाटील के. टी.चौधरी नितीन महाजन सुमित लोखंडे मुकुंदा महाजन कोमल सोनवणे मोनिका पंत यांनी काम पाहिले प्रसंगी शैक्षणिक समूहातील मुख्या. श्रीमती पुष्पा बागुल प्राचार्य सुनिल परदेशी प्रिन्सिपल पी डी शिंपी मुख्या. श्रीमती भावना डोंगरे मुख्या. गणेश बेलेकर उप प्राचार्या कल्याणी वडाळकर आदि उपस्थित होते सर्व यशस्वी बालवैज्ञानिकांचे संस्थेचे उपाध्यक्ष निखिलभाई तुरखीया सौ. सोनाबेन तुरखीया सचिव संजयभाई पटेल समनव्यक हर्षिल तुरखीया यांनी कौतुक केले .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रतिभा बैसाणे व अश्विनी भोपे यांनी केले तर आभार अरुण कुवर यांनी मानले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.