प्रत्येक शाळेवर चंद्रज्योतीच्या बिया संदर्भात जनजागृती करण्याचे शिक्षण विभागाचे आदेश जारी
तळोदा : रेवानगर येथे विद्यार्थ्यांना चंद्रज्योतीच्या बिया खाल्ल्यामुळे रेवानगर येथील ७ विद्यार्थ्यांचा प्रकृतीत बिघाड झाली होती. तात्काळ रुग्णालयात नेल्यामुळे मोठा अनर्थ तळला होता. विद्यार्थ्यांना विषबाधा होण्याचा घटना सतत घडत असतानाही शालेयस्तरावर तसेच ग्रामीण भागात जागृती केली जात नाही. यातून विद्यार्थ्यांचे आयुष्य धोक्यात येऊ शकते. हा प्रकार टळण्यासाठी संबधित प्रशासनाने जनजागृती करण्याची मागणी झाली त्या अनुषंगाने तळोदा तालुका गटशिक्षणाधिकारी यांनी याबाबत तालुक्यातील प्रत्येक शाळेवर चंद्रज्योतीच्या बिया संदर्भात जनजागृती करण्याचे आदेश जारी केले आहेत त्यामुळे पालकांनी समाधान व्यक्त केले आहे..
रेवानगर येथील तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील ७ विद्यार्थ्यांना उलट्यांचा त्रास होऊ लागला होता. परिसरातील नागरिकांनी त्यांनी रुग्णालयात दाखल केले होते. त्यांनी वेळेवर औषधोपचार मिळाल्यामुळे मोठा अनर्थ तळला होता.. चंद्रज्योतीच्या बिया न खाण्याबाबत शाळांतून जनजागृती करण्यासाठी शासनाने जिल्हा परिषद शाळांना निर्देश द्यावे. ज्या परिसरात ही वनस्पती असेल तिथे ग्रामपंचायतीमार्फत सूचना फलक लावावे. अशी मागणी सेवा निवृत्त तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. रोहिदास शेंडे यांनी देखील केली होती. त्यानंतर शालेय प्रशासन गटशिक्षण अधिकारी शेखर धनगर यांच्या वतीने तालुक्यातील सर्व शाळांना चंद्रज्योतीच्या बिया बाबत जनजागृती करण्यासंदर्भातले पत्र काढण्यात आले आहे या पत्रात म्हटले आहे की, चंद्रज्योतीच्या बिया या विषारी असतात. परंतू पालक आणि बालक यांना याबाबतीत माहिती नसते. त्यामुळे असे प्रसंग घडतात. तरी सदर वनस्पती शालेय परिसरात ठेवण्यात येऊ नये. तसेच गावात ही वनस्पती असेल तर पालक आणि बालक यांना याबाबतीत माहिती देण्यात यावी. कुठल्याही स्वरूपात या वनस्पतीच्या बिया सेवन होणार नाही. याबाबतीत शाळा व गांवस्तरावर जनजागृती करण्याचे या पत्रकात म्हटले आहे.
विषारी असलेल्या चंद्र ज्योतीच्याबिया संदर्भात बालकांमध्ये असलेले समज गैरसमज दूर व्हावे, याबाबत जनजागृती व्हावी, याकरिता तळोदा तालुक्यातील गट साधन केंद्र अंतर्गत येणाऱ्या तालुक्यातील सर्वच माध्यमाच्या शाळांना शाळांना पत्र काढण्यात आले आहे. रेवानगर येथे घडलेल्या प्रकारची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून याबाबत जनजागृती करण्याचे आदेश शालेय देण्यात आले आहेत.अशी प्रतिक्रिया
शेखर धनगर
गटशिक्षण अधिकारी तळोदा