मालदा माध्यमिक शाळेत विद्यार्थिनींना सायकल वाटप
तळोदा तालुक्यातील मालदा येथील माध्यमिक विद्यालय येथे इ.9 वी व इ.10 वी च्या विद्यार्थिनींना मानव मिशन योजना अंतर्गत शाळेपासून 3 ते 5 किमी अंतरावरील जुवाणी, करडे, मालदा, गोंडाळे, ध्वजपाणी येथील येणाऱ्या विद्यार्थिनींना सायकल वाटप करण्यात आले.
परिसरातील 36 मुलींना सायकलिंचे वाटप करण्यात आले , त्याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष बोरद जि प शाळेचे मुख्याध्यापक आर एफ शह , शालेय संस्था संचालक ललित मोते, अरुण जैस्वाल , मा.वि.समन्वयक रंजना पावरा, विषय साधन व्यक्ती भरत मराठे , ज्ञानेश्वर माळी, शेख रशिद मण्यार, मालदा गावाचे सरपंच करूना पावरा , गोपी पावरा , बन जि प शाळा मुख्याध्यापक सोनवणे,गोंडाळे जि प मुख्याध्यापक वाल्हे , मालदा जि प शाळा पवार,करडे सरपंच मानसिग पवार ,पो.पाटील वसावे, जुवानी ग्रा. सदस्य मगन दादा शाळेचे मुख्याध्यापक के एस बारेला , एन टी देवरे , व्ही एस बिरारे , आर आर पाटिल , एम एस धनगर , आर बी पटले , के ए टवाळे , एम एस पाटील, सी एन पवार, एम के पावरा आदी.
तसेच शाळेचे मुख्याध्यापक के एस बारेला यांच्या मार्गदशनाखाली शाळेतील सर्व शिक्षक ,आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आर आर पाटील यांनी तर , एम एस पाटील सर यांनी आभार मानले सदर कार्यक्रमास गावातील नागरिक शाळेतील विद्यार्थी आणि विद्यार्थीनी, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते