विठ्ठलराव शिंदे.सह.साखर कारखाना लि. गंगामाईनगर, चे संस्थापक चेअरमान मा.आ. बबनदादा शिंदे यांच्या प्रेरणेतून तसेच जिल्हा सहकारी दूध संघाचे चेअरमन मा.श्री.रणजित भैय्या शिंदे यांच्या संकल्पनेतून एकरी १०० टन उत्पादन उद्दिष्ट या योजनेंतर्गत बेंबळे गटातील मौजे बेंबळे येथील कृषिभुषण श्री.सोमनाथ भास्कर हुलगे यांनी को-८६०३२ या जातीमध्ये आडसाली ऊस लागणीचे एकरी १२५ मे.टन उत्पादन घेऊन ऊस शेतीमध्ये उच्चांकी उत्पादनाची नोंद केली आहे. हुलगेयांनी ०.६० आर क्षेत्रामध्ये १८७.२३७ मे.टन उत्पादन घेतले असून;
सदरच्या ऊसाची लागण दि.०३/०७/२०२१ या तारखेला झाली होती. सदरचा *ऊस ५५ कांड्यांवरती पहायला मिळाला. *एक ऊस सरासरी ०४ किलो ५००ग्रॅम एवढे वजन भरत होता. तसेच पाचट काढणी केल्यानंतर येणाऱ्या वॉटर शूट्सच्या ऊसाची कांडीसंख्या २०-२२ व त्याचे वजन सरासरी ०३ किलो पहायला मिळाले. सदर प्लॉटमध्ये ०५ फूटावरती सारी सोडण्यात आली होती. लागण करतेवेळी एक डोळा दीड फूट अंतर सोडून लागण करण्यात आले होती. सदर ऊस उत्पादकदारास *कृषिरत्न मा.श्री.डॉ.संजीव दादा माने; केन मॅनेजर संभाजी थिटे; मुख्य शेती आधिकारी सुनिल बंडगर; ऊस विकास आधिकारी नारायण लगड; ऍग्रीओव्हरसियर चिंतामण व बिटप्रमुख ढवळे एस आर* यांनी वेळोवेळी प्रत्यक्ष भेट देऊन मार्गदर्शन केले.
या सर्वांच्या मार्गदर्शनाच्या व प्रतिसादाच्या माध्यमातून हुलगे यांनी व्हाट्सअॅपवरती उद्दिष्ट एकरी १०० टन असे ग्रुप बनवले आहेत. त्यामाध्यमातून हजारो ऊसउत्पादक प्रगतशील शेतकरी, कृषी शास्त्रज्ञ, महाराष्ट्र शासन कृषी विभागचे कृषिरत्न, कृषिभूषण यांनी या ग्रुप मार्फत माहितीची देवाणघेवाण करून शेतकऱ्यांना आधुनिक ऊस शेती विषयी तांत्रिक मार्गदर्शन केले जात आहे. या ग्रुपच्या निर्मितीमुळे व विठ्ठलराव शिंदे.सह.साखर कारखान्याचे केन मॅनेजर; मुख्य शेती आधिकारी; ऊस विकास आधिकारी; सर्व ॲग्रीओव्हरसियर तसेच सर्व फिल्ड स्टाफ यांच्या संयोगाने मार्गदर्शक शिवार फेरीच्या माध्यमातून शेतकऱ्याच्या बांधावरती जाऊन मार्गदर्शन करणे सोपे झाले आहे.
तसेच नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर व ड्रोनद्वारे ऊस पिकावरती फवारणी तंत्रज्ञान देखील श्यक्य झाले आहे. सेंद्रिय व रासायनिक खतांची योग्य मात्रा, जैविक खते, संजीवकांच्या फवारण्यांचे आदर्श वेळापत्रक ऊस उत्पादकदारांना देणे श्यक्य झाले आहे. परिणामरुपी अनेक शेतकरी एकरी १००टन उद्दिष्टाचे लक्ष गाठत आहेत. तसेच हुलगे त्यांच्या ऊस व केळी पिकाच्या प्रगतशील शेती व नियोजनबद्धता पाहून महाराष्ट्र शासन कृषी विभाग मार्फत गाव भेट कार्यक्रम- सेवा पंधरवडा व रब्बी हंगाम तंत्रज्ञान मोहिमे अंतर्गत ऊस व केळी या पिकांवरती मार्गदर्शनपर शिबिराचे आयोजन देखील करण्यात आले होते.
त्यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून जिल्हा कृषी अधीक्षक मा.श्री.बाळासाहेब शिंदे, उपविभागीय कृषी अधिकारी कुर्डूवाडी मा.श्री.कांबळे साहेब व संपूर्ण कृषी विभागाच्या टीमने ऊस प्लॉट वरती कार्यशाळा आयोजित केली होती. सोमनाथ हुलगे यांच्या क्षेत्राला कारखान्याचे संस्थापक चेअरमान मा.आ. बबनदादा शिंदे, व्हाईस चेअरमन वामनभाऊ उबाळे, जिल्हा सहकारी दूध संघाचे चेअरमन मा.श्री.रणजित भैय्या शिंदे; माढा तालुक्याचे सभापती मा.श्री. विक्रमदादा शिंदे, उपसभापती मा.श्री. धनंजय जवळगे, कारखान्याचे एम डी एस एन डिग्रजे , केन मॅनेजर संभाजी थिटे, मुख्य शेती आधिकारी सुनिल बंडगर, ऊस विकास आधिकारी नारायण लगड, यादव साहेब(शास्त्रज्ञ, व्ही.एस.आय.), देशमुख मॅडम(शास्त्रज्ञ, व्ही.एस.आय.), आबासाहेब साळुंखे(मा. शास्त्रज्ञ, व्ही.एस.आय.), घोरपडे साहेब(मॅनेजर, महाधन फर्टीलिझेर लिमिटेड), अशोक मामा खोत(ऊस भुषण शेतीनिष्ठ पुरस्कार प्राप्त), भरत रासकर(ऊस संशोधन केंद्र, पाडेगाव) समवेत इतर शास्त्रज्ञ अश्या अनेक अधिकाऱ्यांनी तसेच प्रगतशील शेतकऱ्यांनी सदरच्या ऊसक्षेत्रास भेट देऊन हुलगे यांचे अभिनंदन केले.
तरी कारखान्याच्या सर्व सभासद व ऊस उत्पादकदारानी श्री.सोमनाथ भास्कर हुलगे व अश्या अनेक एकरी १००टन उत्पादन घेणाऱ्या शेतकर्यांप्रमाणे ऊत्पादन वाढीसाठी प्रयत्न करावेत असे आवाहन विठ्ठलराव शिंदे.सह.साखर कारखान्यामार्फत करण्यात आले आहे.