Type Here to Get Search Results !

न भूतो न भविष्यती भव्य कीर्तन महोत्सव मौजे धानिवली येथे संपन्न.



न भूतो न भविष्यती भव्य कीर्तन महोत्सव मौजे धानिवली येथे संपन्न.


मुरबाड तालुका प्रतिनिधी लक्ष्मण पवार




          मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदा या पहिल्या दिवसापासून ते पौष शुद्ध प्रतिपदेपर्यंत एक महिन्याचा संपूर्ण भव्य कीर्तन महोत्सव आज धानिवली गावामध्ये संपन्न झाला.आदरणीय परमपूज्य कमलनाथ नवनाथ महाराज यांच्या प्रेरणेने , मार्गदर्शनाने आणि तसेच ग्रामस्थ मंडळ धानिवली यांच्या सहकार्याने 31 दिवस म्हणजे एक महिन्याचा कीर्तन उत्सव करण्यात आला.




            मुरबाड, शहापूर, कल्याण, अंबरनाथ, भिवंडी, नगर जिल्हा, पुणे जिल्हा, नाशिक जिल्हा,मुंबई ,मुंबई उपनगर पालघर, रायगड नवे नवे तर संपूर्ण महाराष्ट्रातून या धानिवली गावामध्ये समस्थ टाळकरी, धारकरी, माळकरी,वारकरी संप्रदायातील मंडळी यांनी उपस्थित दाखवली, सकाळच्या काकड्यापासून रात्रीच्या जागर भजनापर्यंत दिवसभर कार्यक्रम सुरू असायचे. सकाळी काकडा त्यानंतर ग्रंथ पारायण, नंतर प्रवचन, हरिपाठ, कीर्तन, जागर भजन अशा विविध अंगी भक्तीच्या प्रकारातून भक्तांना लाभ घेता आला. तसेच दत्त जयंती उत्सव मोठ्या प्रमाणात या ठिकाणी साजरा झाला. हजारोच्या संख्येने दत्त जयंती उत्सवामध्ये परिसरातील भाविकांनी दत्त महाराजांचे दर्शन घेतले.


    खासदार मा कपिल पाटील साहेब, मुरबाड विधानसभा आमदार मा किसन कथोरे साहेब,तहसीलदार, गटविकास अधिकारी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक पांढरे साहेब अशा अनेक मान्यवरांनी या महोत्सवाला भेट झाली. तसेच प्रसिद्धीत असलेले मोठे मोठे कीर्तनकार यांनी सुद्धा कीर्तनाची सेवा दिली. मृदुंगमणी म्हणून जगविख्यात असलेले पखवाद वादक तालमनी पंडित प्रतापराव पाटील यांची उपस्थिती होती. विशेष आकर्षण या उत्सवाला होतं ते म्हणजे परमपूज्य गणेश महाराज पिरजी ( त्रिंबकेश्वर )यांच्या उपस्थितीने गाव मंत्रमुग्ध झाला. तसेच गावात पालखी सोहळा च्या माध्यमातून अनेक ग्रामस्थांनी सहभाग घेतला गाव स्वच्छ सुंदर होतं. प्रत्येक घरासमोर सडा रांगोळी काढलेली असायची. असा महिनाभराचा कार्यक्रम सतत गावात चालू होता. आणि प्रत्येक गावातील लहानांपासून तर थोरांपर्यंत सहकार्य मिळालं होतं. विशेषता शिवाजी अण्णा धुमाळ, दीपक महाराज शिंगोळे, वसंत महाराज शिंगोळे, लक्ष्मण महाराज शिंगोळे दत्तात्रय महाराज शेळके, मुरबाड तालुक्याचे भूषण वैभव महाराज मंडलिक, तुंगमणी सुधीर महाराज कराळे, भूषण देशमुख, भीम महाराज भोईर अशा अनेकांनी हरिपाठच्या माध्यमातून, प्रवचनाच्या माध्यमातून, कीर्तनाच्या माध्यमातून साथ दिली. आदर्श ग्राम विकास सांस्कृतिक कला क्रीडा मंडळ धानिवली यांनी दररोज रात्रीच्या जेवण वाढण्याची व्यवस्था अतिशय शिस्तबद्धपणे पार पडली.




  वार शनिवार दिनांक २४/ १२/२०२२ रोजी ह.भ.प जयेश महाराज भाग्यवंत यांचे काल्याचे किर्तन झालं . सर्वांना त्यादिवशी महाप्रसादाचा लाभ मिळाला या ३१ दिवसाच्या, एक महिन्याच्या महोत्सवाची संकल्पना आदरणीय परमपूज्य कमलनाथ नवनाथ महाराज यांनी ज्यांनी ज्यांनी सेवा दिली त्या सर्व गावातील महिला,बचत गट , वरिष्ठ ग्रामस्थ मंडळ,सर्व टाळकरी, चोपदार भालदार, स्वयंपाकी त्याचबरोबर ज्यांनी ज्यांनी ज्याप्रमाणे आपली सेवा दिली त्या सर्वांचं यथोचीत सत्कार कमलनाथ नवनाथ महाराज यांच्या शुभहस्ते करण्यात आला.तसेच आदर्श क्रीडा मंडळ धानिवली व ग्रामस्थ मंडळ धानिवली यांच्यावतीने हा महोत्सव १००% यशस्वी केल्याबद्दल आदरणीय परमपूज्य कमलनाथ नवनाथ महाराज यांचं विठ्ठल रुक्मिणी प्रतिमा, शाल देऊन त्यांचा या ठिकाणी सन्मान करण्यात आला आणि संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री नितीन दामोदर राणे सर यांनी केलं.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

All Time Hi News