केंद्राची शिक्षण परिषद जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गाढवली येथे उत्साहात संपन्न झाली.
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन प्रतापपूर केंद्राचे केंद्र प्रमुख रंजना निकुंभे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी खर्डी खुर्द ग्रुप ग्रामपंचायत सरपंच मालती मोरे, उपसरपंच अमरसिंग ठाकरे , सर्व सदस्य , शाळा व्यवस्थापन अध्यक्ष बोरवान,खर्डी खुर्द,गाढवली केंद्रातील सर्व शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक उपस्थित होते.
जिल्हास्तरावरून देण्यात आलेला माहे सप्टेंबर - नोव्हेंबर २०२२ चा मागोवा व्हिडीओ पीपीटी पाहून विषय उजळणी केंद्रप्रमुख निकुंभे यांनी करून दिली. जिल्हास्तरावरून देण्यात येणाऱ्या पीपीटीवर सविस्तर चर्चा करून ज्या अध्ययन निष्पत्ती मध्ये विद्यार्थी मागे आहेत. भाषा व गणित अध्ययननिष्पत्ती घेऊन गटकार्याच्या माध्यमातून त्यावर चर्चा करून दिलेल्या नमुन्यांच्या आधारे नियोजन प्रवीण गोसावी यांनी दिली व अध्ययननिष्पत्ती आधारित तयार केलेले नियोजन गटाने सादर करावे .
देण्यात आलेली पीपीटी द्वारे प्रभावी वर्गप्रक्रिया व वर्गरचना हा विषय समजून घेऊन यादृष्टीने वर्गपातळीवर याचे नियोजन कसे करता येईल याबाबत विस्तृत चर्चा करून भिमसिंग वळवी यांनी दिली. जिल्हास्तरावरून देण्यात येणाऱ्या पीपीटीच्या मार्गदर्शक मुद्द्यांच्या आधारे, तालुकास्तर डाएटने केलेल्या मार्गदर्शनानुसार नाविन्यपूर्ण अध्यापन पद्धती आधारीत एका पाठाचे सादरिकरण दिनेश सोनवणे यांनी सादरीकरण केले, ज्ञान प्रकाशन अंतर्गत राहुल मिसाळ शाळेतील किमान गरजा ऑनलाईन माहिती भरून घेतली, Breking activity (मोकळीका) अंतर्गत संतोष इंगळे यांनी activity घेतली, जिल्हास्तरावरून देण्यात येणाऱ्या पीपीटी नुसार केंद्रात पालक परिषद प्रक्रिया अंमलबजावणी झालेल्या किमान दोन शाळांनी पीपीटी मध्ये दिलेल्या मुद्द्यानुसार पालक परिषद प्रक्रियेसंदर्भात अनुभव सादरीकरण केले.
केंद्रप्रमुख आणि सिआरजी सदस्य यांनी एकत्रित सिआरजी बैठक घेऊन केंद्रातील चांगल्या बाबी व अडचणींवर चर्चा करून पुढीलपैकी एक विषय, केंद्र गरजा आधारित विषय ठरवण्यात आला. व चर्चा केली. निपून भारत अध्ययन अभ्यास सर्वेक्षण बाबत उमाकांत पाटील यांनी दिली. प्रशासकीय कार्य विषयी केंद्र प्रमुख निकुंभे यांनी गतिमानता व उपडेटशन, उपस्थिती, व रेकार्ड आद्ययावत, सातत्यपूर्ण सर्वकष मूल्यमापन नोंदी, शाळाबाह्य विद्यार्थी गुणवत्ता शिक्षण याविषयी माहिती दिली.प्रसंगी राज्य शिक्षक परिषदेचे राज्य कोषाध्यक्ष पुरुषोत्तम काळे, रामकृष्ण बागल ,(नाशिक विभाग कार्यवाहक) धनंजय सुर्यवंशी जिल्हा अध्यक्ष उपस्थित होते,काळे, बागल, सूर्यवंशी यांनी शिक्षक हिताचे सर्व प्रश्न मार्गी लावणेसाठी कसोशीने प्रयत्न केले जातील असे सांगितले शिक्षण परिषद प्रतिसादाची एकच लिंक असून केंद्रप्रमुख व शिक्षण परिषदेस उपस्थित राहणारे अधिकारी, कर्मचारी, स्वंयसेवी संस्था प्रतिनिधी , शिक्षक, मुख्याध्यापक यांच्यासाठी लिंक अभिप्राय गुगल लिंक ह्याच दिलेल्या वेळेत भरण्यात आली.
शिक्षण परिषदचे प्रास्ताविक भास्कर वेंदे यांनी केले. सूत्रसंचालन भामरे व उपस्थितांचे आभार राजेंद्र वसईकर यांनी मानले. शिक्षण परिषद यशस्वितेसाठी योगेवेंद्र भामरे ,राजेंद्र वसईकर भास्कर वेंदे , मनीषा गोसावी, प्रतिभा भामरे, दिनेश सोनवणे यांनी परिश्रम घेतले.