श्रमदानातून वनराई बंधाऱ्याचे जलपूजन संपन्न
अक्कलकुवा तालुक्यातील डाब येथे लोकसहभागातून एकत्र येऊन वनराई बंधारा साकारण्यात आला.
श्रमदानातून बांधलेल्या वनराई बंधाऱ्याचे जलपूजन ,नाशिक विभागीय कृषी सहसंचालक,मोहन वाघ यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी जलपूजन करून वनराई बंधाऱ्यावरील इलेक्ट्रिक मोटार सुरू करून ठीबक सिंचन द्वारे स्ट्रॉबेरी लागवड केलेल्या क्षेत्राची पाहणी करून मौजे डाब येथील शेतकऱ्याशी चर्चा केली.उपस्थित गावकऱ्यांना वनराई बंधाऱ्याचे महत्त्व समजावून सांगून पावसाळा संपल्यानंतर नाल्यातून वाहणारे पाणी अडवून जमिनीत मुरवणे ,जनावरांना पिण्यासाठी पाणी, आंघोळ व कपडे धुण्यासाठी तसेच हिवाळ्यात स्ट्रॉबेरी लागवडीसाठी संरक्षीत पाणी देऊन बागायती क्षेत्रात वाढ होऊन शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती सुधारण्यास मदत होईल असे सांगितले
सदर क्षेत्रीय पाहणी दौऱ्यासाठी सरपंच डाब आकाश धनसिंग वसावे,पंचायत माजी सदस्य. धनसिंग रुपसिंग वसावे, प्रगतिशील शेतकरी धिरसिंग पुसा पाडवी, टेडया पुसा पाडवी, ठाणसिंग जहाग्या वसावे, तालुका कृषी अधिकारी निलेश गढरी, कृषी विभागाचे अधिकारी व कर्मचारी एम. बी. कामत उपस्थित होते.