भगदरी येथील शेतकऱ्यांचा तोंडाशी आलेला घास जळून खाक
अक्कलकुवा तालुक्यातील भगदरी येथील शेतकऱ्यांचे खरीप हंगामामधील मळणी साठी खळ्यात ठेवलेले पीक जळून खाक झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे .
भगदरी गावांतील डोंगरफळी येथील प्रताप वसावे,गोवा वासावे,भरत वसावे,ओंमदया वसावे,यांनी आपले खरीप हंगामातील पीक हे आपल्या गावातील शेतातच खळे करुन रचून ठेवले होते पण आज तीन वाजेच्या सुमारास अचानक खळ्यातील पिकाला आग लागली.आग लागल्याचे समजताच शेतकरी घटनास्थळी पोहचले त्यांनी आग विझविण्यासाठी प्रयत्न केला मात्र आग पूर्ण लागल्याने ती विझवता आली नाही.त्यामुळे सर्व जळून खाक झाले होते.
त्यात मोर,बंटी,सोयाबीन,आणि भात आदी पिकांचा समावेश आहे. शेतकऱ्यांचे मागील खरीप हंगामातील हाताशी आलेले उत्पन्न पूर्णपणे जळून खाक झाले आहे.