Type Here to Get Search Results !

अखंड नाम जप यज्ञ सप्ताहाची व श्री गुरुचरित्र पारायणाची सांगता


अखंड नाम जप यज्ञ सप्ताहाची व श्री गुरुचरित्र पारायणाची सांगता


तळोदा - शहरातील श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात दत्त जयंती निमित्त सात दिवसांपासून सुरू असलेल्या अखंड नाम जप यज्ञ सप्ताहाची व श्री गुरुचरित्र पारायणाची सांगता आज रोजी गुरुवारी महाआरतीने व महाप्रसादाने आज करण्यात आली. यावेळी सेवेकऱ्यांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. 


     तळोदा येथील श्री स्वामी समर्थ (दिंडोरी प्रणित) सेवा केंद्रात दत्त जयंती निमित्त अखंड नाम जप यज्ञ सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. यात विना वादन, गुरुचरित्र पारायण, सारामृत वाचन, माळ करणे यांसह विविध सेवा या सात दिवसात करण्यात आल्या. १ डिसेंबर पासून सुरू असलेल्या या सप्ताहात सामूहिक गुरुचरित्र पारायणाला १०० सेवेकरी सहभागी झाले.  सात दिवस विविध देवी देवतांचे याग करून सेवा करण्यात केली. दि. ७ रोजी श्री.दत्त जयंती निमित्त गुरुचरित्र ग्रंथातील दत्त जन्माचा अध्याय वाचून सेवा केंद्रात दुपारी १२:३९ वाजता आरती करत जन्मोत्सव साजरा करण्यात आला. याप्रसंगी येथे पूर्ण सप्ताह काळात अखंड नाम जप यज्ञ, अब्ज चंडी याग, मनोबोध याग, मल्हारी याग, रुद्र याग, स्वामी याग, या सारख्या उच्च कोटी सेवेच्या सेवा पार पडल्या. त्याचबरोबर यज्ञ भूमीमध्ये मंडळ स्थापित देवता विसर्जन व सत्यदत्त पूजन करण्यात आले. 


सप्ताह काळात सकाळी ६ ते ८ या वेळेत विशेष याग,यज्ञ,आठ वाजता भुपाळी आरती यानतंर श्री गुरुचरित्र वाचन,सकाळी साडेदहा वाजता नैवेद्य आरती,अकरानंतर अब्ज चंडी सेवा,सांयकाळी साडेसहा वाजता नैवेद्य आरती यानंतर विष्णु सहस्त्रनाम,तसेच अखंड२४ तास महिला व पुरुष सेवेकऱ्यांनी प्रहरेची सेवा रुजू केली. व भाविकांच्या उपस्थितीत सप्ताहाची  सांगता करण्यात आली. यावेळी ,श्री स्वामी समर्थ महाराजांची त्रिकाल आरती तसेच मानवीय जीवनातील कोणत्याही समस्येवर ईश्वरी सेवेतून विनामूल्य मार्गदर्शन सेवा केंद्रात सुरू असून याचा लाभ भाविक भक्तांनी घ्यावा असे आवाहन सेवा केंद्राच्या वतीने करण्यात आले आहे.


नगराध्यक्ष अजय परदेशी यांच्या हस्ते झाली आरती

 तळोदा शहरातील श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात सात दिवसांपासून सुरू असलेल्या अखंड नाम जप सप्ताहाची सांगता आज करण्यात आली. याप्रसंगी तळोदा शहराचे लोकनियुक्त नगराध्यक्ष मा. अजय परदेशी यांनी श्री स्वामी समर्थ महाराजांची आरती केली. व सेवेकऱ्यांशी बोलतांना म्हणाले की, माझ्या जीवनात देखील कठीण प्रसंग आले की, मी फक्त स्वामी महाराजांचे एकच वाक्य आठवते की भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे. हे वाक्य मनाला धीर देते व पुढील वाटचाल मी करत असतो.व मी नगराध्यक्ष बनण्यामागे देखील मला स्वामींचाच मोठा आशीर्वाद आहे. व यापुढे देखील माझी वाटचाल ही स्वामी महाराजांच्या कृपेनेच सुरू राहणार आहे. श्री स्वामी समर्थ केंद्रात कुठल्याही प्रकारची काही मदत लागल्यास मी नक्की सढळ हाताने मदत करेल.असे ते म्हणाले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad