Type Here to Get Search Results !

तलावडी येथे शिक्षणाचे एकदिवसीय प्रशिक्षण कार्यशाळा


तलावडी येथे शिक्षणाचे एकदिवसीय प्रशिक्षण कार्यशाळा


तळोदा एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाचे प्रकल्प अधिकारी मंदार पत्की यांच्या मार्गदर्शनानुसार E. R. C. ( Education Resource Cell ) या प्रशिक्षणाकरिता इयत्ता १ ली ते ८ वी च्या सर्व शिक्षकांना एकदिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम अनुदानित प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा, तलावडी येथे आयोजित करण्यात आला. 


              सदर प्रशिक्षणास तलावडी, कोठार, नर्मदानगर, शिर्वे, नाला, अलिविहिर, लोभाणी, ईच्छागव्हण, सलसाडी, जांभाई, बोरद, राणीपुर, अमोनी या शासकीय व अनुदानित आश्रमशाळेतील इयत्ता १ ली ते ८ वी इयत्तेस शिक्षण देणारे सर्व उपस्थित शिक्षक व शिक्षीका यांना नंदकुमार साबळे ( सहाय्यक प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, तळोदा जि. नंदुरबार ) यांनी मार्गदर्शन केले. तसेच सदर प्रशिक्षणास समन्वयक वाय.यू.जैन ( माध्य. शिक्षक, लोभानी ), व एम.के.वायकर सर ( माध्य. शिक्षक,कोठार ) यांनी मार्गदर्शन केले. सदर प्रशिक्षणास अनुदानित प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा तलावडी येथील माध्य. मुख्या. प्रकाश साळुंके तसेच सर्व शिक्षक, शिक्षिका, अधिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी प्रशिक्षण यशस्वी पणे पार पाडण्यासाठी मेहनत घेतली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

All Time Hi News