डॉ.शशिकांत वाणी व राजेंद्र राजपूत यांची मेहनत फळाला.
गुजरात राज्यातील जंबुसर विधान सभा निवडणूकीत प्रभारी म्हणून तळोदा येथील भाजपाचे डाॅ.शशिकांत वाणी व सह प्रभारी म्हणून राजेंद्रसिंग राजपुत यांची महाराष्ट्र प्रदेश भाजपच्या वतीने नेमणूक करण्यात आली होती.
सदर मतदारसंघात याआधी २ पंचवार्षिक निवडणुकीत भाजपाचा पराभव झाला होता.
जंबुसर हा मुस्लिम बहुल मतदारसंघ होता व याठिकाणी जातीपातीचे राजकारण मोठ्या प्रमाणात असल्याने संघटनात्मक दृष्टया पक्षाची स्थिती कमकुवत व अंतर्गत गटबाजी मोठ्या प्रमाणात होती. अशा परिस्थितीत प्रभारी म्हणून एक आव्हानात्मक जबाबदारी महाराष्ट्रातील या दोघा शिलेदारांवर होती.
अशा वेळी या दोघांनी आपला सर्व राजकीय अनुभव पणाला लावला.व पक्षानेही तेथील गटबाजी संपवून तेथे एकदम नवखे असलेल्या स्वामीनारायण पंथातील डी.के.स्वामी यांना उमेदवारी देऊ केली व त्याठिकाणी प्रभारी व उपप्रभारी शक्तिकेंद्र व बुथस्तरावर बुथ जीतो अभियान राबविण्यात दोघाबरोबर पक्ष यशस्वी झाल्यामुळेच ७५००० हजार मुस्लिम समाजाची मते असुन देखील तेथे पक्षाने २८००० हजार मतांची आघाडी घेत दैदीप्यमान विजय मिळवला. या विजयाचे सर्व श्रेय तेथील जनतेला व मा.मोदी साहेब यांच्या जनकल्याणकारी योजनांना जाते. असे डॉ.वाणी व राजपूत यांनी सांगितले आहे.
त्यांच्या या अनमोल अशा कर्तृत्वाने तळोदा शहराचा ही नावलौकिक केंद्र स्तरावर उंचावला आहे.