भाजपा नंदुरबार जिल्हाध्यक्ष विजय भाऊ चौधरी यांची भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस व उत्तर महाराष्ट्र प्रभारी पदी भाजपाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष माननीय साहेब यांनी नियुक्ती केली. त्यानंतर दिनांक 3 डिसेंबर रोजी माननीय विजयभाऊ चौधरी यांचे नंदुरबार जिल्ह्यात आगमन झाले असता शहरातील धुळे चौफुली येथे भारतीय जनता पार्टी जिल्हा तर्फे भव्य सत्कार करण्यात आला. याप्रसंगी सत्कार करताना शहादा तळोदा मतदार संघाचे आमदार राजेश पाडवी, माजी आमदार शिरीष चौधरी, तळोदा नगराध्यक्ष अजय परदेशी, प्रदेश सदस्य राजेंद्र कुमार गावित, युवा नेते बाळासाहेब मंदार चौधरी व संपूर्ण भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते.
यावेळी माननीय विजयभाऊ चौधरी यांचे बाईक रॅलीद्वारे नंदुरबार शहरात स्वागत व नागरी सत्कार करण्यात आले. यानंतर विजयभाऊ चौधरी यांचे त्यांच्या निवासस्थानी "विजयपर्व" येथे आगमन झाले असता त्यांच्या सुविद्य पत्नी वैशालीताई चौधरी यांनी त्यांचे औक्षण केले.