तळोदा तहसील तिसऱ्या माळ्यावर कामकाजसाठी येणे-जाण्यासाठी ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग बांधवांची मोठी गैरसोय
तळोदा येथील तहसील कार्यालय सुधारणा करीत असल्याने तिसऱ्या माळ्यावर कामकाज सुरू आहे जाण्यासाठी ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग बांधवांना त्रास सहन करावा लागत आहे. ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग बांधवांच्या वतीने आज तहसीलदार यांना भोईराज नवयुवक मंडळातर्फे निवेदन देण्यात आले.
तळोदा येथील भोईराज नवयुवक मंडळाच्या वतीनेदिलेल्या निवेदनात म्हटले आहे कि, गेल्या कित्येक दिवसापासून नवीन इमारतीत ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग बंधूंचे हाल अपेष्टा होत होते सदर बाब आमच्या निदर्शनास आली, नवीन इमारतीत दिव्यांग व जेष्ठ नागरिकांसंदर्भात कोणताही विचार करण्यात आलेला नव्हता जेष्ठ नागरिकांना तसेच दिव्यांग बांधवांना प्रत्येक छोट्या-मोठ्या कामासाठी तिसऱ्या मजल्यापर्यंत जाने म्हणजे भागीरथ प्रयत्न करण्यासारखे होते, कामकाजासाठी पायऱ्या चढत उतरत दमछाक होते यावर त्वरित कार्यवाही करून जेष्ठ नागरिक व दिव्यांग बंधूंना दिलासा देतील ही अपेक्षा या संदर्भात निवेदन देण्यात आले निवेदन संतोष वानखेडे, शिवदास साठे, जगदीश वानखेडे, गणेश शिवदे, जतीन साठे, गिरीष वानखेडे, सचिन भोई आदी उपस्थित होते