भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस व उत्तर महाराष्ट्र प्रभारी विजय चौधरी यांचा पदाधिकारी मार्गदर्शन मेळावा घेतला
नंदुरबार जिल्हाध्यक्ष विजय चौधरी यांची भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस व उत्तर महाराष्ट्र प्रभारी पदी निवड झाल्याबाबत नंदुरबार जिल्ह्यात भव्य स्वागत सत्कार, बाईक रॅली व नागरी सत्कार द्वारे स्वागत झाले त्यानंतर माननीय विजय भाऊ चौधरी यांच्या उपस्थितीत भाजपा जिल्हा कार्यालय "विजयपर्व" येथे पदाधिकारी मार्गदर्शन मेळावा संपन्न झाला. याप्रसंगी मार्गदर्शन करताना प्रदेश तथा उत्तर महाराष्ट्र प्रभारी व भाजपा जिल्हाध्यक्ष विजय चौधरी यांनी मार्गदर्शन केले.
याप्रसंगी व्यासपीठावर आमदार राजेश पाडवी, शिरीष चौधरी, तळोदा नगराध्यक्ष अजय परदेशी, विजय चौधरी यांच्या सुविद्य पत्नी वैशालीताई चौधरी, जिल्हा संघटन सरचिटणीस निलेश माळी, जिल्हा सरचिटणीस जितेंद्र जमदाडे, जिल्हा सरचिटणीस राजेंद्र गावित, जिल्हा उपाध्यक्ष मकरंद पाटील, जिल्हा उपाध्यक्ष सदानंद रघुवंशी, जिल्हा उपाध्यक्ष डॉ.अग्रवाल, प्रदेश सदस्य राजेंद्र कुमार गावित, नवापूर तालुका अध्यक्ष भरत गावित, अक्कलकुवा विधानसभा प्रभारी कपिल चौधरी, ओबीसी मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष महेंद्र पटेल, आदिवासी मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष नागेश पाडवी, अल्पसंख्यांक मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष एजाज शेख, तळोदा शहराध्यक्ष योगेश चौधरी, नगरसेविका अंबिका शेंडे नारायण ठाकरे आदी मान्यवर उपस्थित होते
याप्रसंगी मान्यवरांनी ही आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.