बोरद येथील ग्रामसभेत शिवीगाळ करून मारहाण करणाऱ्यांना अटक करा -बिरसा फायटर्स
तळोदा तालुक्यातील बोरद येथील ग्रामसभेत बिरसा फायटर्सचे विभागीय प्रवक्ता दयानंद चव्हाण व त्यांच्या आई यांना मारहाण करणाऱ्याना तात्काळ अटक करा म्हणून बिरसा फायटर्सने तळोदा पोलीस निरीक्षकांना निवेदन देवून मागणी केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, दि.३० नोव्हेंबर रोजी बोरद ग्रामसभेत सरपंच अनिता मनोहर भिलाव व पेसा अध्यक्ष तिच्या सासरे रतिलाल भिलाव ऐवजी पेसा अध्यक्ष दुसरा नेमावा असे इंदिराबाई मंगलसिंग चव्हाण यांनी ग्रामसभेला सांगितले असता विजयसिंग चतुरसिंग राजपूत(उपसभापती तळोदा)यांनी शिवीगाळ केली.इंदिराबाई चव्हाण यांचे मुलगा दयानंद चव्हाण(विभागीय प्रवक्ता बिरसा फायटर्स)यांनीही काही सत्ताधारी लोकांकडून मारहाण करण्यात आली आहे.दयानंद चव्हाण यांच्या मुलगा ग्रामसभेत नसतांनाही मुद्दाम खोट्या गुन्ह्यात अडकविण्यासाठी खोटी फिर्याद संबंधित सत्ताधारी लोकांनी केली आहे.सामान्य नागरिकांना बोलू न देता शिवीगाळ करून मारहाण केली जात आहे हे दुर्दैवी बाब आहे.लोकशाहीची हत्या आहे.सदर प्रकरणाची पारदर्शकपणे सखोल चौकशी करून,अटक करण्यात यावी अशी मागणी बिरसा फायटर्सने केली आहे.निवेदनावर जिल्हाध्यक्ष भरत पावरा,जिल्हा निरीक्षक सुभाष पाडवी,अक्कलकुवा तालुकाध्यक्ष मानसिंग पाडवी,तळोदा तालुका सल्लागार संजू ठाकरे,सहसंघटक कालूसिंग पावरा,रांझणी शाखाध्यक्ष सुरेश मोरे,पाल्हाबार रापापूर शाखाध्यक्ष शिवाजी तडवी,रोझवा पुनर्वसन शाखाध्यक्ष बारक्या पावरा,धजापाणी शाखाध्यक्ष डोंगरसिंग पावरा,सायसिंग वळवी,बाबुलाल वळवी,कैलास पाडवी,वसंत वळवी,अशोक पावरा,सुभाष पाडवी, शांताराम वसावे, प्रकाश पवार,तरता वळवी आदी.कार्यकर्त्यांच्या सह्या आहेत.