जागतिक एड्स दिवसाच्या निमित्ताने आज अक्कलकुवा ग्रामिण रुग्णालयात एकात्मिक समुपदेशन आणि उपचार केंद्रा मार्फत जनजागृती पर कार्यक्रम संपन्न झाला
कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. संतोष परमार,रुग्ण कल्याण समितीचे सदस्य सुधीरकुमार ब्राम्हणे,वैद्यकीय अधिकारी डॉ. अफसर शेख,डॉ. अजय परदेशी पत्रकार मिलिंद गुलाले आदी उपस्थित होते. यावेळी ग्रामीण रुग्णालयाच्या आवारात उपस्थित रुग्ण व रुग्णांचे नातेवाईक तसेच समलिंगी संबंध ठेवणारे पुरुष यांना एड्स बाबत मार्गदर्शन करण्यात आले याप्रसंगी समुपदेशक महेश कुवर यांनी एड्स पासून काळजी घेण्याचे मार्गदर्शन केले व एच.आय.व्ही बधितां सोबत भेदभाव न करता त्यांच्याशी प्रत्येकाने माणुसकीने व समानतेने वागण्यासाठी उपस्थितां कडून शपथ घेण्यात आली. कार्यक्रमाला अधिपरिचारिका आर.एस.दीक्षित, करुणा परमार, पी.जी.गावित, सोनाली वसावे मीना देसाई,आदी उपस्थित होते कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी युवराज प्रजापती,विशाल चौधरी,हनुमंत भिसे,राजेंद्र पाडवी,अल्ताफ शेख,राजू पाडवी यांनी परिश्रम घेतले.