विभाग स्तरीय वुशू, या स्पर्धेत साक्षी जगदाळे यश, राज्य पातळीवर निवड
तळोदा येथील शिक्षणमहर्षी प्राचार्य भाईसाहेब गाे. हु. महाजन न्यु हायस्कूल व श्री शि. ल. माळी कनिष्ठ महाविद्यालयातील साक्षी जगदाळे, या विद्यार्थिनीने नंदुरबार येथे पार पडलेल्या विभाग स्तरीय वुशू, या स्पर्धेत घवघवीत यश मिळवले आहे. ती आता नाशिक विभाग चे प्रतिनिधित्व करणार आहे
नाशिक विभागीय स्पर्धा नंदुरबार येथे नुकत्याच पार पडल्या या स्पर्धेत विद्यालयातील साक्षी जगदाळे या विद्यार्थिनीने १९ वर्षे वयोगटात ६५ किलो ग्रॅम वजनी गटामध्ये सहभागी होती. या वेळी तिचा सोबत संघ व्यवस्थापक रेखा कलाल उपस्थित होत्या
. यशस्वी खेळाडूंचा या यशाबद्दल अध्यापक शिक्षण मंडळाच्या अध्यक्षा मंगलाताई महाजन, तळाेदा काँलेज ट्रस्टचे संचालक अरुणकुमार महाजन, तसेच सर्व संचालक, विद्यालयाचे प्राचार्य अजित टवाळे, उपप्राचार्य अमरदीप महाजन, पर्यवेक्षक बी. जी. माळी, पर्यवेक्षक ए. एल. महाजन, वरिष्ठ लिपिक डी. पी. महाले, क्रीडा विभाग प्रमुख एस. एस. सुर्यवंशी, क्रीडा शिक्षक एन. आर. सुर्यवंशी, पी. व्ही. माळी, पी. पी. हिवरे आणि सर्व शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी त्यांचे काैतुक करून अभिनंदन केले आहे. तसेच पुढील हाेणाऱ्या विभागीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.