Type Here to Get Search Results !

चिनोदा येथे राष्ट्रीय शेतकरी दिवस साजरा

 



चिनोदा येथे राष्ट्रीय शेतकरी दिवस साजरा


 तळोदा तालुक्यातील चिनोदा येथे राष्ट्रीय शेतकरी दिवस साजरा करण्यात आला.

      भारत हा शेती प्रधान देश असून  शेतकरी हा भारताच्या अर्थव्यवस्थेचा कणा मानला जातो. शेतकऱ्यांबद्दल आदर व्यक्त करण्यासाठी दरवर्षी २३ डिसेंबर रोजी भारताचे ५ वे पंतप्रधान चौधरी चरणसिंग यांच्या जयंतनिमित्त 'राष्ट्रीय शेतकरी दिवस' साजरा केला जातो. या निमितने चिनोदा येथे शेतकरी दिवस साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला प्रगतिशील शेतकरी हिरालाल मराठे, मयुर मराठे, कपिल मराठे, अरुण मराठे, विलास मराठे, तुळशीराम पाटील, उपस्थित होते. 

     यासाठी आकाश पानपाटील, रोहितकुमार सुर्यवंशी, प्रणव पाटील, प्रथमेश पाटील, आर्यन पवार, श्रेयस शिंदे या कृषिदूतनी संवाद साधला. त्यासाठी दोंडाईचा कृषि महाविद्यालयाचे प्राचार्य आर.बी.राजपूत, कार्यक्रम समन्वयक प्रा.रविंद्र देशमुख, कार्यक्रम अधिकारी प्रा.विवेक चव्हाण, प्रा. पराग बागुल यांचे मार्गदर्शन लाभले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad