Type Here to Get Search Results !

गोंडवाना राज्य निर्मिती मागणीसाठी परसोडा बस स्टॉप चौकात आंदोलन



गोंडवाना राज्य निर्मिती मागणीसाठी परसोडा बस स्टॉप चौकात आंदोलन


चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी मनोज गोरे

कोरपणा कोरपणा तालुक्यातील तेलंगणा महाराष्ट्र सीमेवर असलेल्या परसोळा या ठिकाणी राज्य महामार्गावर बस स्थानक चौकात आज 22 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता आदिवासी बांधव यांनी रास्ता रोको आंदोलन करून गोंडवाना राज्य निर्मिती करण्यात यावी गोंडवानाकालीन गड किल्ले धार्मिक स्थळ यांची शासनाने दुरुस्ती करून संरक्षणासाठी अर्थसहाय्य आर्थिक मदत द्यावी गोंडीधर्मालात वैज्ञानिक मान्यता गोंडी भाषेला आठवी अनुसूचित समावेश करा गोडी धर्माची स्वतंत्र जनगणना करण्यात यावी बापूराव शेडमाके यांचा इतिहास अभ्यासक्रमात समावेश करा आदिवासीच्या विकासाच्या दृष्टीने घरकुल शेती विषयी इत्यादी योजना शासनाने राबवाव्यात भूदान जमीन वैद्दार पट्टेदार यांच्यावरील उत्पादित जमिनीवर वारसांची नोंद न घेता आर्थिक भ्रष्टाचार करून परस्पर वारसा नसलेल्या लोकांना पट्टे देण्यात सातबारा बनविणे हा गोरख धंदा भ्रष्टाचार बंद करण्यात यावा पेसा पत्रात असलेल्या व सुटलेल्या गावांना पेसा गावात समावेश करा आधी मागण्या घेऊन आज आदिवासी बांधव यांनी जवळपास दोन तास रास्ता रोको केला.




नारेबाजी करीत शासनाचे लक्ष वेधले यावेळी राष्ट्रीय गोंडवाना संग्राम परिषदेचे प्रदेशाध्यक्ष नामदेवराव किनाके संग्राम परिषद जिल्हा संघटक श्यामराव उईके गोंडवानात संग्राम परिषद तालुका सचिव बंडू कन्नाके गोंडवाना संग्राम परिषद तालुका अध्यक्ष प्रभाकर आत्राम प्रकाश येरमे सचिन शिळाम अमरनाथ मडावी आकाश पार्वताबाई वेलादी रूपाताई पर्वताताई वेलदी सुंदराबाई भीमराव वेलादी सुरेश मळावी मनोज मेश्राम प्रकाश आत्राम आदी शेकडो आदिवासी बांधव उपस्थित होते



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad