Type Here to Get Search Results !

श्री सम्मेदशिखर जैन महातीर्थ ला सरकारने पर्यटन स्थल घोषित केल्याच्या विरोधात अक्कलकुवा तालुका जैन समाजाचा वतीने कळकळीत दुकाने बंद;



श्री सम्मेदशिखर जैन महातीर्थ ला सरकारने पर्यटन स्थल घोषित केल्याच्या विरोधात अक्कलकुवा तालुका जैन समाजाचा वतीने कळकळीत दुकाने बंद; 


तहसीलदार रामजी राठोड यांचा मार्फत राष्ट्रपति व प्रधानमंत्री यांना निवेदन




जैन समाजचे 24 तीर्थंकर पैकी 20 तीर्थंकरांची निर्वाण भूमि असलेले झारखंड राज्यातील गिरिडीह जिल्ह्यातील श्री समेदशिखर महातीर्थ ज्याला पारसनाथ पर्वत म्हणून ओळखले जाते. अशी पवित्र तीर्थ स्थानला झारखंड सरकारचा अनुशंसानाने केंद्रीय वन मंत्रालय द्वारा श्री समेदशिखर तीर्थ ला पर्यटन स्थल घोषित करण्यात आले. यामुळे तीर्थ स्थान च्या पवित्रताला धोका निर्माण होणार आहे. जैन समाज हा अहिंसा परमो धर्म वर विश्वास ठेवनारा समाज असून श्री सेमदशिखर तीर्थ है जैन समाजाचे पवित्र तीर्थ स्थान असून याला पर्यटन स्थल घोषित करने चुकीचे असून तत्काल सरकार ने हा निर्णय मागे घेऊन जैन तीर्थ क्षेत्र घोषित करावे यासाठी आज दिनांक 21 डिसेम्बर रोजी सकल जैन समाज तर्फे भारत बंद ची हाक देण्यात आली असून अक्कलकुवा तालुक्यात ही बंदला उत्तम प्रतिसाद देत तालुक्यातील अक्कलकुवा, खापर, वाण्याविहीर, मोलगी येथे सकल जैन समाज बाँधवानी आपली दुकाने, कार्यालये बंद ठेऊन सरकारचा निर्णयाचा निषेध केला आहे. दुपारी 1 वाजता जैन आराधना भवन पासून मुख्य मार्ग होत तहसील कार्यालय पर्यंत मुक्क रैली काढण्यात आली




यावेळी तहसीलदार रामजी राठोड यांचा मार्फत देशाच्या राष्ट्रपति व प्रधानमंत्री यांना निवेदन देण्यात आले

यावेळी जैन मुनि प.पू. जयचंद्रसागरजी म.सा. उपस्थित होते त्यांचा सह तालुक्यातील जैन समाजातील शिष्टमंडळ सह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad