झाप ग्रामपंचायत मधील नळ पाणीपुरवठाच्या ७ कोटी २० लाखाची योजनेचा शुभारंभ.
पालघर जिल्हा प्रतिनिधी:- सुनिल जाबर
झाप ग्रामपंचायत मधील जल जीवन मिशन योजनेचा ७ कोटी २० लाखाची योजनेचा शुभारंभ करण्यात आला. सदर ही योजना आवेश मोदी या सुपरवायजर आणि एजन्सी ने घेतली आहे. या योजनेचा झाप ग्रामपंचायत मधील १० पाडे मधील २९७५ लोकसंख्येला फायदा होणार आहे.यावेळी येथील लोकनियुक्त सरपंच श्री.एकनाथ दरोडा यांनी बोलताना सांगितले की,गेल्या २०१६ पासून काळ शेती धरणा वरून झाप ग्रामपंचायत मधे पाणी यावे हा ड्रीम प्रोजेक्ट उराशी ठेवून यासाठी प्रयत्न चालू होते .
या अगोदर मुख्यमंत्री पेयजल योजना मधून सदर नळपाणी पुरवठा योजना करीता पाठपुरावा चालू होता परंतु काही तांत्रिक अडचणी मुळे त्यावेळी सदर योजना मंजूर होऊन टेंडर प्रोसेस ला कॅन्सल झाली होती.त्यानंतर ही पाठ पुरावा करीत सदर योजना जल जीवन योजनेतून मंजूर होऊन आज तिचा शुभारंभ करण्यात आला असून लवकरच झाप ग्रामपंचायत मधील सर्व घराला पाणी मिळणार याचे समाधान आहे .यावेळी जव्हार पंचायत समितीच्या सभापती श्रीमती विजयाताई लहारे मॅडम (सभापती, प स जव्हार) यांनी बोलताना सांगितले की, सदर योजना एकदाच होणार आहे त्यामुळे या योजनेचा उदेश्य सफल झाली पाहिजे .
यावेळी श्री सुरेश कोरडा आहे (माजी सभापती), श्री. चंद्रकांत रंधासाहेब (माजी उपसभापती), श्री राजेश पाध्ये(उप अभियंता, ग्रामीण पाणी पुरवठा जव्हार) श्री भावेश पाटील (कनिष्ठ अभियंता) श्री संकेत पगार(कनिष्ठ अभियंता) श्री एकनाथ दरोडा (सरपंच ग्रापंचायत झाप) श्री दयानंद लहारे(सामजिक कार्यकर्ता),उप सरपंच सखाराम वड,अमोल भोये (ग्रामसेवक ) ग्रामपंचायत सदस्य विलास बागुल,महेंद्र गवारी,वंदना दरोडा,अनिता खांजोडे,युवराज वाघ,कल्पना वतास,लता राठड,ग्रामपंचायत कर्मचारी,जगन खानझोडे,काशिनाथ तेळवडे व लक्ष्मण खांझोडे,नामदेव गवारी,देवराम गवारी व मोठ्या प्रमाणात नागरिक उपस्थित होते