मा.विजयभाऊ चौधरी यांच्या हस्ते कोपर्ली येथे संताजी जगनाडे महाराज यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमापूजन
ओबीसी महासंघ तथा तेली महासंघ आयोजित श्री संत संताजी जगनाडे महाराज यांच्या जयंतीनिमित्त आज दिनांक 8 डिसेंबर रोजी नंदुरबार जिल्ह्यातील कोपर्ली या गावी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करताना भाजपा महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस तथा उत्तर महाराष्ट्र प्रभारी व प्रदेश तेली महासंघ प्रदेशाध्यक्ष महाराष्ट्र तथा भाजपा जिल्हाध्यक्ष विजयभाऊ चौधरी. यावेळी कोपर्ली गावात श्री संत संताजी जगनाडे महाराज यांच्या जयंतीनिमित्त भव्य रॅली निघाली. याप्रसंगी युवा मोर्चा जिल्हा अध्यक्ष हर्षल पाटील, ओबीसी महासंघ जिल्हाध्यक्ष देवेंद्र कलाल, ओबीसी महासंघ युवक जिल्हाध्यक्ष प्रशांत माळी, ओबीसी महासंघ महिला अध्यक्ष प्रतिभा चौधरी, ओबीसी महासंघ युवक जिल्हा उपाध्यक्ष साजन साठे, ओबीसी महासंघ युवक जिल्हा सचिव जयेश ओबीसी महासंघ महिला तालुका अध्यक्ष सुषमा सोनवणे, ओबीसी महासंघ युवक जिल्हा कार्याध्यक्ष चेतन माळी, ओबीसी महासंघ युवक जिल्हा सहसचिव, कपिल चौधरी जितेंद्र लाहोटी, भरत चौधरी, अविनाश बिर्ला, ताराचंद भोई, विनोद वानखेडे, रवींद्र मराठे, गोपाल चौधरी, जितू राजपूत, बालाभाऊ बिर्ला आदी ओबीसी महासंघ तथा तेली महासंघ पदाधिकारी, कार्यकर्ते, बंधू-भगिनी उपस्थित होते.
याप्रसंगी कोपर्ली ओबीसी महासंघ तथा तेली महासंघ व ग्रामस्थांच्या वतीने भाजपा नंदुरबार जिल्हाध्यक्ष विजय चौधरी यांची भाजपा महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस तथा उत्तर महाराष्ट्र पदी निवड झाल्याने त्यांचा शाल पुष्पगुच्छ देत सत्कार करण्यात आला.