पालिका देणार ५ रुपयात कापडी पिशवीप र्यावरण संरक्षणासाठी पालिकेचा उपक्रमश हरातील ५ ठिकाणी लावले व्हेंडिंग मशीन
तळोदा :- शहरातील नागरिकांना प्लास्टिक पिशव्यांना पर्याय उपलब्ध व्हावा यासाठी तळोदा येथील पालिका प्रशासनाच्या वतीने कापडी पिशव्या उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. त्यासाठी शहरामध्ये ५ ठिकाणी व्हेंडिंग मशीन लावण्यात आले आहेत. यामध्ये पाच रुपयांचा कॉईन टाकल्यावर कापडी पिशवी मिळत आहे.
शहराला प्लास्टिक मुक्त करण्याच्या उद्देशाने पालिकेकडून जनजागृतीचे विविध उपक्रम हाती घेतले आहेत. प्लास्टिक पिशवी ही एक मोठी समस्या असून राज्य शासनाने प्लास्टिक बंदीचा निर्णय सर्वत्र लागू केला आहे. याच अनुषंगाने नगरपालिकेने प्लास्टिक पिशव्यांना पर्याय म्हणून कापडी पिशव्या माफक दरात उपलब्ध करून दिल्या आहेत.
शहरामध्ये प्लास्टिक बंदीची अंमलबजावणी सुरू आहे. त्यासोबतच नागरिकांना कापडी व पर्यावरणपूरक पिशव्या वापरण्यासाठी प्रोत्साहन दिले जात आहे. आरोग्य विभागाच्या वतीने कचऱ्याचे विलगीकरण केले जाते. त्यामधील कापड वेगळे करण्यात येणार आहे.
भविष्यात व्हेंडिंग मशीनवर क्युआर कोड देखील लावण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांना फोन पे, गुगल पेद्वारे पैसे पटवून कापडी पिशवी मशीनमधून घेता येणार आहे. त्यासाठी आरोग्य विभाग कामाला लागला आहे.
शहर स्वच्छतेसाठी शहरामध्ये प्लास्टिक बंदी करण्यात आली आहे. त्याची प्रभावी अमलबजावणी करण्यासाठी नागरिकांना पर्याय उपलब्ध करून दिला पाहिजे. त्यासाठी कापडी पिशव्या नागरिकांना सहज उपलब्ध करून देण्यासाठी पालिका प्रयत्न करत आहे. त्यानुसार शहरामध्ये ५ ठिकाणी व्हेंडिंग मशीन लावण्यात येणार आहे. पुढे याची संख्या वाढवण्यात येणार असल्याची माहिती नगराध्यक्ष अजय परदेशी यांनी दिली आहे.
प्लास्टिक पिशवी बंद व्हावी याकरिता नगराध्यक्ष अजय परदेशी यांच्या प्रयत्नांतून शहरातील ५ ठिकाणी पालिकेने मशीने बसविले आहेत. नागरिकांचा चांगला प्रतिसाद असून मशिन अजून वाढवली जाणार आहेत.
आश्विन परदेशी
पा.स्वच्छता निरीक्षक
याठिकाणी बसविण्यात आले मशीन
नवीन नगरपालिकेखाली हनुमंत मेडिकलच्या बाजूला,
मुख्य बाजार पेठीतील साई इलेक्ट्रिक जवळ,
सविधान चौकातील याहा मोगी मेडिकल जवळ
भन्साळी प्लाझा जवळील भाजी बाजारात
जुनी पालिका परिसरात
अश्या ५ ठिकाणी हे मशीन लावण्यात आले आहेत.