आज मुंबई येथे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा ना.श्री.देवेंद्रजी फडणवीस यांची भेट घेऊन
देगलूर - बिलोली विधानसभा मतदार संघातील सिमावर्ती भागाच्या नागरी समस्या सोडवण्यासाठी राज्य सरकार ने १००० कोटीचा रु प्रारुप आराखडा तयार करावा अशी मागणी - आ.जितेश अंतापुरकर यांनी केली
माझा देगलूर - बिलोली मतदार संघ तेलंगाणा व कर्नाटक राज्याच्या सिमेलगत आहे. तेलंगना व कर्नाटक राज्यातील विविध शासकीय योजना व नागरी सुविधांची या सिमावर्ती भागातील नागरीक तुलना करतात. त्यासोबतच या दोन्ही राज्यातील आरोग्य, शिक्षण, रस्ते, उद्योग, कृषी, वीज व इतर मुलभूत सेवासुविधा आपल्या राज्यापेक्षा सरस आहेत. त्यामुळे माझ्या मतदार संघातील सिमावर्ती भागाच्या नागरीकांमध्ये मोठा रोष आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात माझ्या विनंतीवरुन माजी मुख्यमंत्री मा.श्री. अशोकराव चव्हाण साहेब यांनी सिमावर्ती भागाचा दौरा केला होता व या भागातील पुल व रस्त्याच्या निर्मितीसाठी २०८ कोटी रुपये मंजूर केले होते. परंतु आपल्या या शासनाने या कामांना स्थगिती दिली आहे. त्यामुळे लोकांमध्ये अधिकचा रोष वाढला आहे.
या सर्व बाबींचा विचार करुन माझ्या विधानसभा मतदार संघातील सिमावर्ती गावांच्या विकासाचा प्रारूप आरखडा तयार करावा व या आराखडयामध्ये आरोग्य, शिक्षण, रस्ते, उद्योग, कृषी, वीज या क्षेत्रातील मुलभूत सेवासुविधा निर्माण करण्यासाठी कमीत कमी १००० कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करुन देण्यात यावा.