Type Here to Get Search Results !

ध्वजदिन निधी संकलनाचा शुभारंभ 13 डिसेंबरला



ध्वजदिन निधी संकलनाचा शुभारंभ 13 डिसेंबरला


नंदुरबार, दि.8 :- दरवर्षी 7 डिसेंबर हा सशस्त्र सेना ध्वज दिन म्हणून देशभरात साजरा केला जातो. नंदुरबार जिल्ह्याचा सशस्त्र सेना ध्वजदिन 2022 निधी संकलनाचा शुभारंभ 13 डिसेंबर, 2022 रोजी होणार असल्याची माहिती माहिती संजय गायकवाड, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, नंदुरबार यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे. 


सशस्त्र सेना ध्वज दिनासापासून सर्व राज्ये आजी, माजी सैनिकांच्या कल्याणासाठी जनतेकडून निधी गोळा करतात. जनतेने सैनिकांच्या त्यागाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस असतो. नंदुरबार जिल्ह्याचा सशस्त्र सेना ध्वजदिन 2022 निधी संकलनाचा शुभारंभ मंगळवार 13 डिसेंबर, 2022 रोजी दुपारी 12-00 वाजता क्रांतीवीर बिरसा मुंडा सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, नंदुरबार  येथे आयोजित केला आहे. 


 या कार्यक्रमाचा शुभारंभ जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांच्या अध्यक्षतेखाली होणार असून या कार्यक्रमास जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, जिल्हा पोलीस अधिक्षक पी.आर.पाटील, अपर जिल्हाधिकारी महेश पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे, सहायक जिल्हाधिकारी मीनल करनवाल, मंदार पत्की, जिल्हा पुरवठा अधिकारी महेश शेलार, जिल्हा माहिती अधिकारी रणजितसिंह राजपूत  यांची प्रमुख उपस्थितीत राहणार आहे. 


यावेळी जिल्ह्यातील वीरपत्नी, वीरमाता, वीरपिता यांचा सत्कार करण्यात येणार आहे. तसेच मागील वर्षी उत्कृष्ट ध्वजदिन निधी संकलन केलेल्या अधिकारी व कर्मचारी यांना प्रोत्साहनपर सन्मानपत्र देवून गौरविण्यात येणार आहे. तरी जिल्ह्यातीली माजी सैनिक व त्यांचे कुटुंबियांनी तसेच ध्वजदिन निधी संकलनाचे उत्कृष्ट कार्य केलेल्या सर्व शासकीय, निम शासकीय अधिकारी व कर्मचारी यांनी कार्यक्रमास उपस्थित रहावे. असे आवाहन श्री. गायकवाड यांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

All Time Hi News