शिंदे - फड़नविस हे राज्याचे सुपरफास्ट सरकार ...... सुधिर मुंगटीवार
सावली तालुका भाजपाचा शेतकरी शेतमजूर मेळावा
मेळाव्यात भाजप कार्यकर्त्यांची हजारोची उपस्थिति
अनेक कांग्रेस कार्यकर्त्यांचा भाजपात पवेश
चंद्रपुर/सावली प्रतिनिधी मनोज गोरे
आम्हाला ज्यानी धोका दिला त्याना त्यांच्याच लोकांनी धोका दिल्याने राज्यात अल्पावधितच सतान्तर झाले राज्यात नव्या आलेल्या शिंदे - फडणवीस सरकारने सत्तेत येताच शेतकरी शेतमजूरांच्या हिताचे निर्णय घेण्यास सुरुवात केल्याने राज्यातील शिंदे - फडणवीसांचे सरकार हे राज्याचे सुपर फास्ट सरकार असल्याचे मत जिल्ह्याचे पालकमंत्री ना सुधिर भाऊ मुनगंटीवार यानी व्यक्त केले ते तालुक्यातील व्याहाळ खुर्द येथे आयोजित भाजप शेतकरी शेतमजूर कार्यकर्ता मेळाव्यात उदघाटक म्हणून बोलत होते ए जे पाल विद्यालय व्याहाळ खुर्द येथे सावली तालुका भाजपाच्या वतिने शेतकरी शेतमजूर कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले
त्यावेळी मंचावर जिल्ह्याचे पालकमंत्री ना सुधीरभाऊ मुंगटीवार चिमूर - गडचिरोली लोकसभा क्षेत्राचे खासदार अशोक भाऊ नेते माजी आमदार अतुल भाऊ देशकर जिल्हाध्यक्ष देवरावदादा भोंगड़े रेखाताई डोळस संजय गजपुरे नामदेव डावले माजी जि प सदस्य संतोष तगड़पलिवार महामंत्री सतीश बोम्मावार नगरसेविका नीलम सुरमवार जि प सदशया योगिता ङबले ,माजी सभापती छाया शेंडे जि प सदशया मनीषा चिमुरकर आदि मान्यवर उपस्थित होते महाविकास आघाडी च्या निमित्याने राज्यात असलेल्या कांग्रेस सरकारने मागील दोन वर्ष्यात शेतक ऱ्याच्या हिताचे काम केले नाही मात्र सत्तेत आलेल्या शिंदे - फडणवीस सरकारने नियमित कर्ज भरना ऱ्या शेतक ऱ्याच्या खात्यात ५० हजार रु जमा केले त्यासाठी १३ हजार कोटि मजूर केले या भागातील मत्स्य व्यवसायासाठी जल जीवन मिशन अंतर्गत २०० कोटी ची तरतूद केली सोबतच अनेक तलावांची खोली करुन त्याठिकाणी मत्सव्यवसाय निर्माण व्हावा मासेमारी व्यवसायातून रोजगार निर्माण करण्याचा पर्यन्त सुरु केला,तालुक्यातील कृषि क्षेत्र जास्त असल्याने शेतकऱ्यांच्या पिकाला योग्य भाव बोनस देण्याचे सुध्दा हे सरकार प्रयत्नशील असल्याचे सांगितले, आरोग्य, शिक्षण, पायाभुत सुविधा जिल्ह्यात चांगल्या पध्दतीने राबविण्यात येतील,अनेक ग्रामपंचायती विजेचे बिल भरण्यासाठी टाळाटाळ करताना दिसतात, सामान्य फंडात पैसे नाही असे सांगतात अशांना आता सौर.उर्जेचे फ्लेग देण्यात येणार ,नैसर्गिक ऊर्जेचा वापर.करावा ,गायरान, गावठाण ,महसूल जागेवर अतिक्रमण करून वास्तव्य करीत असलेल्या लोकांना तहसील कार्यालयाने नोटीस बजावले, परंतु त्यांना कोणीही बेघर.करणार नाही, त्यांना स्थायी पट्टे देण्यासाठी न्यायालयात सरकार याचिका दाखल करणार असून सिंचनाच्या दृष्टीने ब्रिटिश कालीन तलावांची खोली त्यांचे नुतनिकरण करुण पाण्याची योग्य सुविधा निर्माण केलि जाईल भारतीय जनता पक्ष हा केवळ पक्ष नसून परिवार आहे त्यामुळे या भागातील शेवटचा मानुस सुखी संपन्नी असावा हे आपले धेय असून तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही तत्पर राहु असेही ते म्हणाले यावेळी कांग्रेस पक्ष्यतिल अनेक कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केला त्यांचे सुधा पालकमंत्र्या च्या हस्ते स्वागत करण्यात आले
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कृष्णा राऊत प्रास्ताविक भाजप तालुका अध्यक्ष अविनाश पाल,तर आभार गुड्डू चिमुरकर यांनी केले ,यावेळी मोठ्या संख्येने भाजपा कार्यक्रर्त उपस्थित होते .....