Type Here to Get Search Results !

घोडपेठ येथील शेतशिवारात आढळला मृतदेह



घोडपेठ येथील शेतशिवारात आढळला मृतदेह


भद्रावती तालुक्यातील घोडपेठ येथील शेतशिवारातील एका शेतात एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ ऊडाली आहे.




सदर घटना घोडपेठ येथील शेतशिवारात दिनांक २रोज शुक्रवारला सकाळच्या वेळेस उघडकीस आली.सदर घटनेची माहिती भद्रावती पोलिसांना मिळाल्यानंतर त्यानी घटनास्थळी पोहोचून आवश्यक त्या कारवाईला सुरुवात केली आहे.दरम्यान मृतदेहाची स्थिती पाहता हा घातपात असावा अशी चर्चा परिसरात आहे.घोडपेठ गावाजवळून साधारणतः एक किलोमिटर अंतरावर घोडपेठ-चालबर्डी रस्त्यावरील सुधाकर कळस्कर यांच्या शेतात हा मृतदेह आढळून आला आहे.त्याला दुर्गंधी येत असल्याने हा मृतदेह येथे एकदोन दिवसांपासून पडलेला असावा असा अंदाज आहे.प्रेताची जिभ ही बाहेर आली असल्याने हा घातपात तर नसावा असा अंदाज व्यक्त होत आहे.भद्रावती पोलीस या घटनेचा पुढील तपास करीत आहे.


चंद्रपूर प्रतिनिधी मनोज गोरे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad