Type Here to Get Search Results !

जुगनाळा येथे भव्य व्हॉलीबॉल क्रीडा स्पर्धेचे बक्षीस वितरण जुगनाळा येथे भव्य व्हॉलीबॉल क्रीडा स्पर्धेचे बक्षीस वितरण



जुगनाळा येथे भव्य व्हॉलीबॉल क्रीडा स्पर्धेचे बक्षीस वितरण


माजी जि. प. सदस्य प्रमोदभाऊ चिमुरकर यांच्या हस्ते बक्षीस वितरण


चैतन्य युवा स्पोर्ट्स गडचिरोली संघ विजयी




ब्रम्हपुरी तालुक्यातील जुगनाळा येथील युवा स्पोर्ट्स क्लब जुगनाळा च्या वतीने भव्य व्हॉलीबॉल क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ नुकताच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जुगनाळाच्या भव्य पटांगणावर पार पडला. *या बक्षीस वितरण समारंभाला बक्षीस वितरक म्हणून माजी जि. प. सदस्य प्रमोदभाऊ चिमुरकर विशेष उपस्थित होते* तर प्रमुख अतिथी म्हणून जुगनाळाच्या सरपंच लक्ष्मीताई सहारे, जुगनाळाचे उपसरपंच गोपालभाऊ ठाकरे, चंद्रशेखर मेश्राम ग्रा. पं.सदस्य, देविदास कार, विनोद सहारे अध्यक्ष से.स.सो., मधुकर ढोरे अध्यक्ष शा. व्य. स., धनराज मुळे उपस्थित होते.  




              या स्पर्धेमध्ये चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यातील अनेक संघानी सहभाग घेतला होता. व्हॉलीबॉल क्रीडा स्पर्धेचा अंतिम सामना चैतन्य युवा स्पोर्ट्स गडचिरोली विरुद्ध ईगल युवा स्पोर्ट्स गडचिरोली यांच्यामध्ये झाला. चुरशीच्या सामन्यामध्ये चैतन्य युवा स्पोर्ट्स गडचिरोली संघाने विजय मिळवून प्रथम क्रमांकाचे बक्षीस मिळवले. तर ईगल युवा स्पोर्ट्स गडचिरोली दुसऱ्या क्रमांकाचे बक्षिस मिळविले, तिसऱ्या क्रमांकाचे बक्षीस युवा स्पोर्ट्स क्लब जुगनाळा संघाने पटकावले. 

             व्हॉलीबॉल स्पर्धेचे प्रथम बक्षीस रोख १५ हजार रुपये माजी जि. प. सदस्य प्रमोदभाऊ चिमुरकर, द्वितीय बक्षिस रोख १० हजार रुपये माजी जि. प. उपाध्यक्ष क्रिष्णा सहारे, भाजपा जिला सचिव तनय देशकर, तर तृतीय बक्षीस रोख ७ हजार रुपये जुगनाळाच्या सरपंच लक्ष्मीताई सहारे, जुगनाळाचे उपसरपंच गोपालभाऊ ठाकरे यांच्या कडून ठेवण्यात आले होते. तर चंद्रशेखर मेश्राम, हरिओम किराणा स्टोर्स, सुरेश चौधरी, सागर मंडपे, विक्की चौधरी, मंगेश देवतळे, मधुकर ढोरे, सुनील तोंडरे डेकोरेशन, देविदास नागमोती, राहुल क्षीरसागर, सुरज चौधरी, यश गेडाम, शुभम राऊत, मुन्ना क्षीरसागर यांच्या वतीने विशेष बक्षीस ठेवण्यात आले होते.

              या बक्षीस वितरण समारंभ प्रसंगी बक्षिस वितरक म्हणून उपस्थित प्रमोदभाऊ चिमुरकर यांनी, व्हॉलीबॉल हा क्रिकेट प्रमाणेच खूप लोकप्रिय क्रीडाप्रकार आहे. ग्रामीण भागातील मुलांना व्हॉलीबॉल खेळ खेळण्यास प्रेरणा मिळावी या हेतूने युवा स्पोर्ट्स क्लब जुगनाळाच्या वतीने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. हा अत्यंत स्तुत्य उपक्रम आहे. या स्पर्धेत गडचिरोली च्या संघांनीं प्रभावी आक्रमण व उत्कृष्ट बचावाचा खेळ करीत स्पर्धेचे विजेतेपद मिळविलं आहे. विविध तालुक्यातूनआलेल्या खेळाडूंनीही खिलाडूवृत्तीने अप्रतिम खेळ केला आहे. यापुढेही तालुक्यात खेळाडू घडविण्याचे काम करणाऱ्या अस्या स्पर्धांना नेहमी सहकार्य करू.असे प्रतिपादन केले.

               स्पर्धा यशस्वी करण्यासाठी युवा स्पोर्ट्स क्लब जुगनाळाचे शुभम राऊत, राहुल क्षीरसागर, त्रिमूर्ती ठाकरे, यश गेडाम, अक्षय गुरनुले, सुरज चौधरी, साहिल गजपुरे, नागेश देव्हारी, रेवण ढोरे, दुर्गेश देव्हारी, समीर गुरनुले, मुन्ना क्षीरसागर सह इतर सदस्यांनी अथक परिश्रम घेतले.

मनोज गोरे प्रतिनिधी चंद्रपूर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad