सिंदेवाही तहसील कार्यालयाच्या वतीने महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना नवीन मतदार विषयी जनजागृती कार्यक्रम
चंद्रपूर प्रतिनिधी मनोज गोरे
सिंदेवाही - सर्वोदय विद्यालय सिंदेवाही राष्ट्रीय सेवा योजना विभाग व तहसील कार्यालय सिंदेवाही यांच्या संयुक्त विद्यमाने आज दिनांक 3 डिसेंबर शनिवारला सकाळी 9-00 वाजता नवीन मतदार जागृती शिबिर सर्वोदय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना याविषयी मार्गदर्शन करण्यात आले प्रमुख उपस्थितीमध्ये दत्तात्रय धात्रक नायब तहसीलदार सिंदेवाही , प्राचार्य नागलवाडे सर, रिजवान शेख सर, रणदिवे सर हे होते.विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना नायब तहसीलदार धात्रक म्हणाले की,
प्रत्येक नागरिकाने लोकशाहीच्या वीकासाकरिता व देशाच्या प्रगतीकरिता देशहीत जपत आपले कर्तव्य करण्याकरिता तत्पर असावे. देशहीत साधले तर व्यक्तीगत हित नक्कीच साधले जाते. तेव्हा भारतीय संविधानाच्या आधारे मिळालेल्या मतदानाचा उपयोग सकारात्मक दृष्टीने व्हावा याकरिता शासन व प्रशासन स्तरावरुन नाना त-हेने नाना प्रयत्न केले जात आहेत. असे विद्यार्थ्यांना सांगितले.
नवीन मतदार जागृती शिबीर कार्यक्रमाचे प्रास्ताविक रिजवान शेख सर यांनी केले तर आभार प्रदर्शन रनदीवे सर यांनी केले.