युद्ध अटल आहे नाटकाला सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा ग्रीन सिग्नल
६१ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेत "युद्ध अटळ आहे "नाटकाने पटकावला प्रथम
क्रमांक !!
सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले कलाकारांचे अभिनंदन
मुरबाड दिनांक 17 प्रतिनिधी लक्ष्मण पवार
नुकताच महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक विभाग संचालन आयोजित ,६१ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धा संपूर्ण राज्यभर सुरु असून, या स्पर्धेत कल्याण विभागामधून अनेक दर्जेदार नाटकांचे प्रयोग सादर करण्यात आले.त्यात गर्जा प्रतिष्ठान मुरबाड निर्मित व नवक्रांती मित्र मंडळ दहिवली शहापूर या संस्थेच्या वतीने **युद्ध अटळ आहे**या नाटकास प्रथम पारितोषिक जाहीर झाल्याची घोषणा सांस्कृतिक कार्य संचालनालयाने प्रसिद्धी पत्रक द्वारे केली .
नुकताच कल्याण विभागात झालेल्या राज्य नाट्य स्पेर्धेत मुरबाड तालुक्यातील गर्जा प्रतिष्टान या संस्थेने निर्मित केलेल्या व नवक्रांती मित्र मंडळ दहिवली शहापूर या संस्थेने सादर केलेल्या युद्ध अटळ आहे
या नाटकाची कल्याण विभागातून अंतिम फेरी साठी निवड करण्यात आली आहे. कल्याण विभागातील स्पर्धेत एकूण १९ नाटके सादर करण्यात आली असून दर्जेदार नाटकांची चुरशीची लढाई पाहायला मिळाली या स्पर्धेत मुरबाडच्या कलाकारांनी सादर केलेल्या युद्ध अटळ आहे या नाटकाला सर्वोत्कृष्ट नाटक हे पारितोषिक मिळाले आहे.
तसेच या नाटकाचे लेखक दिग्दर्शक नितेश मंगल डोंगरे यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक तर सर्वोत्कृष्ट नेपथ्य साठी संदीप सदानंद कापडी ,सर्वोत्कृष्ट रंगभूषा वैजयंता मंगल डोंगरे ,
प्रकाश योजना द्वितीय क्रमांक सचिन मालू धुमाळ , तर अभिनयासाठी पुन्हा एकदा नितेश डोंगरे व संतोष भांडे यांना गुणवत्ता प्रमाण पत्रके घोषित करण्यात आली आहेत.या स्पर्धेत या नाटकाने सात पारितोषकांसह युद्ध अटळ आहे हे नाव प्रथम पारितोषकावर कोरले आहे .
महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून हौशी रंगभूमीवर कार्य करणाऱ्या असंख्य रंगकर्मी साठी राज्य नाट्य स्पर्धा म्हणजेच एक अनमोल सुवर्णसंधी, या संधीचे सोने करण्यासाठी असंख्य कलावंत वर्षभर झटत असतात.त्यात मुरबाड तालुक्यातील गर्जा प्रतिष्ठान हि संस्था हि त्यापैकीच एक .या संस्थेने आजवर अनेक स्पर्धां मध्ये आपले कौश्यल्य सिद्ध केले आहे. त्यांनी निर्मित केलेल्या व नवक्रांती मित्र मंडळ दहिवली शहापूर यांनी या "स्पर्धेत युद्ध अटळ आहे? हे नाटक सादर केले. या नाटकाचे लेखन व दिग्दर्शन नितेश मंगल डोंगरे यांनी केले असून, नेपथ्य संदीप कापडी , रंगभूषा वैजयंता डोंगरे, प्रकाशयोजना सचिन धुमाळ , संगीत सचिन कालेकर ,महेश वालकोळी , निर्मिती प्रमुख कुणाल घोलप, समीर खुटारे निर्मिती सहाय्यक चंद्रकांत राणे व्यवस्थापनाची संपूर्ण जबाबदारी वैभव खाटेघरे, विकास गोंधळी , जयेश माळी तर कलाकार म्हणून संतोष भांडे, अजिंक्य डोंगरे, प्रथमेश रोठे ,गणेश शिंगोळे, रोशन देसले ,चैताली कुलकर्णी, संदीप कापडी, भूषण मोरे, संदीप खरे ,आणि नितेश डोंगरे यांनी अभिनय केले. तर नवक्रती मित्र मंडळ दहिवली शहापूर संस्थेचे संस्थापक श्री दत्ता पाटील यांनी या नाट्य प्रयोगासाठी विशेष मेहनत घेतली. मुरबाड तालुक्यातील कलाकाराच्या या घवघवीत यशाचे संपूर्ण तालुक्याच्या सर्वच स्थरातून कौतुक केले जात आहे . १५ नोव्हेंबर ते १४ डिंसेंबर २०२२ या कालावधीत आचार्य अत्रे रंगमंदीर कल्याण येथे अतिशय जल्लोषात झालेल्या या स्पर्धेत एकुण १९ नाट्यप्रयोग सादर करण्यात आले . या स्पधेसाठी परीक्षक म्हणुन सर्वत्र सुरेंद्र वानखेडे,रमेश थोरात आणि शाशिकांत चौधरी यांनी काम पाहिले. सर्व पारितोषिक विजेत्यांचे सांस्कृतिक कार्य मंत्री श्री. सुधीर मुनगुंटीवार यांनी अभिनंदन केले.