नेमसुशिल कनिष्ठ महाविद्यालयातील मुलींचा व्हॉलीबॉल संघाची विभागीय स्तरावर निवड
जिल्हा क्रीडा विभाग आयोजित शालेय क्रीडा स्पर्धा अंतर्गत नंदुरबार येथील पोलीस कवायत मैदानात झालेल्या जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत तळोदा येथील नेमसुशील कनिष्ठ महाविद्यालयातील 19 वर्ष वयोगटातील मुलींच्या व्हॉलीबॉल संघाने जिल्हास्तरावर विजय मिळवून विभागस्तरावर स्थान मिळविले. विजयी संघास क्रीड़ा शिक्षक सी.जी.वळवी, योगेश पाडवी, सुनील वळवी, वैशाली नरसिंगे यांचे मार्गदर्शन लाभले.
त्यांच्या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष निखिलभाई तुरखिया, संचालिका सोनाबेन तुरखिया, उपाध्यक्ष महाले, सचिव संजयभाई पटेल, समन्वयक हर्षिल तुरखिया, कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य सुनील परदेशी, मुख्याध्यापिका भावना डोंगरे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी कौतुकास्पद अभिनंदन केले. व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्यात