तालुकास्तरीय स्पर्धेत नेमसुशील माध्यमिक विद्यामंदिराच्या रवींद्र सुतार व सायली हिने प्रथम क्रमांक मिळविला
जागतिक अल्पसंख्याक हक्क दिवस निमित्त तालुकास्तरीय विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. त्यात नेमसुशील माध्यमिक विद्यामंदिराची इ. दहावीची विद्यार्थिनी सायली रवींद्र सुतार हिने प्रथम क्रमांक मिळविला.
बिरसा मुंडा सभागृह, ज़िल्हाधिकारी कार्यालय, नंदुरबार येथे ज़िल्हाधिकारी मनीषा खात्री, मुख्य कार्यकारी अधिकारी गावडे, शिक्षणाधिकारी, जिल्हा परिषद,
पोलिस अधीक्षक पी आर पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत
या विद्यार्थिनीस पदक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
यशस्वी विद्यार्थिनीस विद्यामंदिराचे जेष्ठ शिक्षक आय. पी.बैसाणे व प्रा. मिलिंदकुमार पाटोळे यांचे मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष निखिलभाई तुरखिया, संचालिका सोनाबेन तुरखिया, उपाध्यक्ष महाले, सचिव संजयभाई पटेल, समन्वयक हर्षिल तुरखिया, विद्यामंदिराचे प्राचार्य सुनील परदेशी, मुख्याध्यापिका भावना डोंगरे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी कौतुकास्पद अभिनंदन केले.