भारतीय जनता पार्टी तर्फे पाकिस्तानी विदेश मंत्री बिलावल भुट्टो यांच्या जाहीर निषेध
देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्याबाबत अभद्रभाषा व विवादात्मक टिप्पणी केल्याबद्दल पाकिस्तानी विदेश मंत्री बिलावल भुट्टो याची प्रतिमा जाळून तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे व प्रदेश सरचिटणीस तथा जिल्हाध्यक्ष नंदुरबार विजय चौधरी यांच्या आदेशान्वये महाराष्ट्रभर बिलावल भुट्टो यांच्या वादग्रस्त विधानाबद्दल निषेध व्यक्त होत आहे. संपूर्ण देशात भुट्टो याच्या वादग्रस्त वक्तव्याबद्दल संतापाची लाट आहे. पार्श्वभूमीवर तळोदा भारतीय जनता पार्टी वतीने तळोदा येथे यांच्या भुट्टो व पाकिस्तान च्या निषेधार्थ घोषणाबाजी करत फोटोला काळे फासण्यात आले,
भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष योगेश चौधरी यांच्या नेतृत्वात नगराध्यक्ष अजय परदेशी, नगरसेवक रामानंद ठाकरे, नगरसेवक गौरव वाणी, ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष प्रदीप शेंडे,जिल्हा चिटणीस हेमलाल मगरे,अनुसूचित जाती जिल्हा सरचिटणीस अंबालाल साठे, अनुसूचित जाती शहराध्यक्ष जीवन अहिरे, शहर उपाध्यक्ष राजकपूर मगरे, शहर सरचिटणीस पंकज तांबोळी, जिल्हा युवा मोर्चा उपाध्यक्ष दीपक चौधरी, शहर व्यापारी आघाडी अध्यक्ष दीपक कलाल, शहर चिटणीस गोकुळ मिस्त्री, कोषाध्यक्ष अरविंद प्रधान, धनराज पाडवी आदींसह उपस्थित होते.