परराष्ट्रमंत्री बिलावल भूट्टो यांचा शहादा तालुका भाजपातर्फे निषेध
अमेरिकेमध्ये पाकिस्थानचे परराष्ट्रमंत्री बिलावल भूट्टो यांनी भारत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बद्दल अपशब्द काढले त्या निषेधार्थ भारतीय जनता पार्टी शहादा तालुका तर्फे खेडदिगर येथे बिलावल भुट्टो याचा पुतळा जाळुन पाकिस्थान मुर्दाबाद, बिलावल भूट्टो मुर्दाबाद, अश्या घोषणा देत जाहीर निषेध करण्यात आले.
या वेळी भा.ज.पा. कार्याध्यक्ष डॉ.किशोर पाटील, तालुका सरचिटणीस हिम्मतसिंग गिरासे, भा.ज.पा युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष रमाशंकर माळी, तालुका उपाध्यक्ष बालू पाटील, ओ.बी.सी.मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष योगेश पाटील, कपिल जयस्वाल भा.ज.पा.किसान मोर्चा ता.सरचिटणीस, विनोद पाटील, डॉ.विजय चौधरी,
गणेश बागुल सरपंच खेडदिगर, सुभाष वाघ भाजपा युवा मोर्चा सयोजक, सुनिल पवार भाजपा युवा उपाध्यक्ष, देविदास महाजन, गोपाल पवार, दिनेश मुसळदे, अनिल ठाकरे, नवनाथ वाघ सरपंच कोचरा, पंकज रामोडे या सह कार्यकर्ते उपस्थित होते.