Type Here to Get Search Results !

राष्ट्रीय सेवा योजना श्रमसंस्कार शिबिरात पंचायतराज व आजचा युवक विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन.



राष्ट्रीय सेवा योजना श्रमसंस्कार शिबिरात पंचायतराज व आजचा युवक विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन.


  प्रतिनिधी- दिनेश आंबेकर 


गिरीवासी सेवा मंडळ कल्याण संचालित मुरलीधर नानाजी मोहिते गुरुजी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय खोडाळा-जोगलवाडी यांच्या राष्ट्रीय सेवा योजना विभाग वतीने दिनांक १३ डिसेंबर ते १९डिसेंबर २०२२ पर्यत कोचाळे गावात आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत युवकांचा ध्यास ग्राम,शहर विकास ही संकल्पना घेऊन विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबीर संस्थेचे अध्यक्ष व महाविद्यालयाचे प्राचार्य यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित केले असून आज जव्हार तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते व ग्रामपंचायत सदस्य प्रा.मनोज कामडी यांनी विद्यार्थ्यांना पंचायतराज व आजचा युवक या विषयावर मार्गदर्शन करतांना त्रिस्तरीय पंचायतराज रचना मध्ये ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद या स्थानिक स्वराज्य संस्थाची कार्य पद्धती, तसेच सरपंच, सभापती, जिल्हा परिषद अध्यक्ष यांचे स्थान व पदाचे महत्व पटवून दिले, तसेच राजकिय क्षेत्रातील आजचा युवक यांची भूमिका पटवून सांगताना त्यांनी स्वतः ग्रामपंचायत निवडणूक लढवून विजयी होण्यासाठी कसे प्रयत्न करावे लागतात हे स्वतः चे अनुभव विद्यार्थ्यांना पटवून सांगितले,तसेच राजकारणात पारदर्शक व प्रमाणिक पणे काम केले तरच आपल्या भागाचा होऊ शकतो. राजकारण हे फक्त निवडणूक होइपर्यंत ठेवून नंतर समाजकारण करून काम करावे तरच आपण लोकांना न्याय देऊ शकतो असे मत मांडले, त्याच बरोबर महिलांना राजकारण ५०"%आरक्षणमुळे महिला सरपंच, सभापती, जिल्हा परिषद अध्यक्ष पदापर्यंत पोचते परंतु महिला स्वतः निर्णय घेऊ शकत नाही त्यामुळे राजकारणात आरक्षित पदावर बसल्यावर स्वतः निर्णय घ्यावे तरच महिला सक्षमीकरण झाले असे मत मांडले. तसेच त्यांनी स्वतःचे कॉलेज जीवनातील अनुभव विद्यार्थ्यांना सांगताना आपल्या जीवनात जी संधी येईल त्याचं सोन करता आलं पाहिजे.त्याच बरोबर सध्याच्या सोशल मीडियामुळे आजचा युवक का भरकटत असतो परंतु स्वतःच्या पायावर उभे राहून आपण काहीतरी स्वतः चा व्यवसाय, नोकरी, स्वतः करण्याची जिद्द असेल तरच या सध्याच्या युगात टिकू शकतो हे युग स्पर्धेचे युग आहे. राष्ट्रीय सेवा योजना शिबिराच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना श्रमसंस्कार देण्याचं काम केले जाते मी स्वतः या शिबिरामुळे घडलो असून आज मी हिमतीने विद्यार्थ्यांनसमोर स्पष्ट बोलू शकतो.तसेच मार्गदर्शनाच्या समारोप प्रसंगी विद्यार्थ्यांना मनोरंजन म्हणून राम नारायण बाजा बाजाता या गाण्यानी विद्यार्थ्यांची मने जिंकली सदर कार्यक्रमाप्रसंगी कोचाले गावचे युवा उपसरपंच हनुमंत फसाळे, सदस्य मिलींद बदादे,सुरेश गिरधले, कार्यक्रम अधिकारी प्रा. दीपक कडलक, प्राध्यापक, विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad