Type Here to Get Search Results !

हिंदु राष्ट्राचा आवाज बुलंद करण्यासाठी तळोदा येथे 11 डिसेंबरला 'हिंदु राष्ट्र जागृती सभा' ! - डॉ. सतीश बागुल, हिंदु जनजागृती समिती



हिंदु राष्ट्राचा आवाज बुलंद करण्यासाठी तळोदा येथे 11 डिसेंबरला 'हिंदु राष्ट्र जागृती सभा' ! - डॉ. सतीश बागुल, हिंदु जनजागृती समिती


तळोदा:-  भारताच्या संविधानात प्रस्तावनेत प्रत्येक नागरिकाला समता, बंधुता आणि न्याय मिळेल, असे म्हटले जाते. प्रत्यक्षात आपल्या देशात अल्पसंख्य आयोग, सच्चर आयोग, अल्पसंख्यांक विकास मंत्रालय आहे; मात्र बहुसंख्य हिंदूंना कोणतेही संरक्षण देणारे मंत्रालय आयोग नाही. देशभरात केवळ हिंदूच्याच मंदिरांचे सरकारीकरण, तर मशिदी चर्चचे सरकारीकरण का नाही ? अल्पसंख्याकांना धर्माच्या आधारावर शैक्षणिक अनुदान, मग बहुसंख्य हिंदूनी कार्य अपराध केला आहे ? हे सर्व पहाता भारतात खरोखरच 'सेक्युलर व्यवस्था अस्तित्वात आहे का ? हिंदूच्या हजारी युवतींना उद्ध्वस्त करणारा नवा आतंकबाद म्हणजे 'लव्ह जिहाद' भारतीय अर्थव्यवस्थेवरील नवे संकट 'हलाल जिहाद' यांसारख्या हिंदूवर होणाऱ्या अनेक अन्यायांना वाचा फोडण्यासाठी, तसेच हिंदु राष्ट्राचा आवाज बुलंद करण्यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या बतीने ११ डिसेंबर २०१२ या दिवशी माळी समाज मंगल कार्यालय, तळोदा येथे सायंकाळी ५:३० वाजता हिंदु राष्ट्र-जागृती सभा आयोजित करण्यात आली आहे, अशी माहिती हिंदु जनजागृती समितीचे नंदुरबार जिल्हा समन्वयक डॉ. सतीश बागुल यांनी पत्रकार परिषदेत दिली.




या प्रसंगी डॉ. बागुल पुढे म्हणाले, "सनातन संस्थेचे धर्मप्रचारक सद्गुरु नंदकुमार जाधव, हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगढ़ राज्य संघटक श्री. सुनील घनवट आणि हिंदु जनजागृती समितीच्या रणरागिणी शाखेच्या कु रागेश्री देशपाड या वक्ते म्हणून या सभेत मार्गदर्शन करणार आहेत. या सभेच्या ठिकाणी क्रांतीकारकांबद्दल माहिती देणारे फलक, हिंदूंना प्रतीदिन करावयाच्या धर्माचरणाच्या कृती, साधना यांविषयी मार्गदर्शन करणारे फलक प्रदर्शन, तसेच हिंदूंमध्ये जागृती करणाऱ्या ग्रंथांचे अन् हिंदूना धर्मशिक्षण देणाऱ्या विविध ग्रंथाचे प्रदर्शनही लावण्यात येणार आहे. तसेच स्वसंरक्षण प्रशिक्षण प्रात्यक्षिके दाखवण्यात येणार आहेत.


सभेसाठी तळोदा शहर परिसरासह तालुक्यातील अनेक गावामध्ये प्रसार चालू असून गेले महिनाभर विविध तरुण मंडळे, महिलांचे गट, ग्रामस्थ, हिंदुत्वनिष्ठ, लोकप्रतिनिधी यांच्या बैठका घेण्यात येत आहेत. कोपरा बैठका यांसमवेत भित्तीपत्रके, हस्तपत्रके, फलकलेखन, होर्डिंग, सामाजिक संकेतस्थळ यांच्या माध्यमातून व्यापक स्तरावर सभेचा प्रसार चालू आहे. अनेक युवक धर्मरक्षणाच्या कार्यात सहभागी होण्याची इच्छा प्रदर्शित करत आहेत. या सभेच्या प्रचारासाठी १० डिसेंबर या दिवशी श्रीदत्त मंदिर (आरंभ) होऊन शहरातील मुख्य मार्गावर सकाळी १० वाजता बाहनफेरी काढण्यात येणार आहे. या फेरीत हिंदूंनी सहभागी व्हावे, तसेच दिनांक ११ डिसेंबर २०२२ या दिवशी सायं. ५:३० वा. माळी समाज मंगल कार्यालय येथे होणाऱ्या सभेसाठी हिंदूंनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन डॉ. बागुल यांनी केले आहे. पत्रकार परिषदेत  रणरागिणी समितीचे राजश्री देशपांडे, अमोल वानखेडे, अमन जोहरी, मयूर चौधरी आदीजन उपस्थित होते ...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

All Time Hi News