आमदार राजेश पाडवी यांना दिलेली जबाबदारी यशस्वी तापी जिल्ह्यात भाजपचे वर्चस्व
शहादा, ता.८ : गेल्या पाच पंचवार्षिक पासून काँग्रेसच्या गड असलेल्या व्यारा व निझर मतदार संघात भाजपला घवघवीत यश मिळाले येथील शहादा तळोदा मतदारसंघाचे आमदार राजेश पाडवी यांच्याकडे पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी तापी जिल्हा प्रभारी म्हणून नियुक्ती केली होती अहोरात्र मेहनत करत त्यांनी जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडत कार्यकर्त्यांच्या सहकार्याने विजयश्री खेचून आणला.
गुजरात राज्याचा विधानसभा निवडणूकीमध्ये नंदुरबार जिल्ह्या लगत असलेल्या तापी जिल्हा प्रभारी म्हणून भाजपचा वरिष्ठ नेत्यांनी आमदार राजेश पाडवी यांच्या वरती जबाबदारी सोपवली होती आणि व्यारा आणि निझर विधानसभा मतदारसंघात अहोरात्र मेहनत घेत व्यारा व निझर येथील कार्यकर्त्यांनी विजयश्री खेचुन आणण्यात यशस्वी झाले. गेल्या पाच पंचवार्षिक पासून काँग्रेस गड असलेल्या दोन्ही मंतदार संघात भाजपाला घवघवीत यश मिळाले असुन आमदार राजेश पाडवी यांचा वरती पक्षातील वरीष्ठानी टाकलेली जबाबदारी यशस्वी पणे पार पाडली देशाचे पंतप्रधान नरेंद्र जी मोदी साहेब यांचा वरती परत जनतेने दाखवला विश्वास दाखवला असल्याचे या निवडणुकीच्या निकालावरून सिद्ध झाले.