अँड.सरदारसिंग वसावे यांची विभागीय भ्रष्टाचार निर्मुलन समितीवर सदस्य पदी निवड
अक्कलकुवा तालुक्यात असलेल्या सातपुडा परिसरातील सामाजिक क्षेत्रात प्रदिर्घ कालावधीचा कामाचा अनुभव असलेले व लोकांचा विश्वास संपादन करणारे सामाजिक कार्यकर्ता तथा समाजसेवक अँड.सरदारसिंग रुपसिंग वसावे यांची विभागीय भ्रष्टाचार निर्मुलन समिती,नाशिक तथा विभागीय आयुक्त ,नाशिक विभाग याद्वारे विभागीय भ्रष्टाचार निर्मुलन समिती,नाशिक विभाग या समितीवर दि. ०६/१२/२०२२ ते दि. ०६/१२/२०२४ या कालावधीसाठी त्यांची अशासकीय सदस्य म्हणुन निवड करण्यात आली आहे. सातपुड्याच्या ग्रामीण भागातील या समितीवर सदस्य म्हणून निवड झाल्याने त्यांचे सातपुडा परिसरातील सर्व समाजाच्या बांधवांकडुन कौतुक व अभिनंदन करण्यात येत आहे तसेच त्यांना पुढील वाटचाली साठी सुभेच्छा दिल्या जात आहे.