Type Here to Get Search Results !

वीज महावितरणाचा अजब गजब कारभार



वीज महावितरणाचा अजब गजब कारभार




किनवट तालुक्यातील वीज महावितरण विभागाचा मनमानी कारभारामुळे मौजे हुडी येथील मारोती दिगांबर अटळकर या शेतकऱ्याला तब्बल दोन लाख बेचाळीस हजार चारशे दहा रुपये बील दिल आहे . या कुटुंबबीयाचे वार्षीक उत्पन्न 50 हजार रुपयाच्या जवळपास असलेल्या अटळकर कुंटुंबबीयांना अचानक लाखोच्या घरात बील आल्याने पायाखालची मातीच सरकली असे वाटले . नोव्हेंबर 2022 चे लाखो रुपयाचे बील कसे भरावे या चिंतेत आहे. याबरोबरच नारायण नागोबा तांबारे यांना सत्तरा हजार पन्नास रुपये चालू महिन्याचे दिल आहे बाबुराव दगडू कदम यांना ऐकोन चाळीस हजार नव्वद रुपये तर , शिवाजी पुंजाजी मिराशे यांना चौदा हजार नवशे नव्वद रुपये रेग्युलर बील आल्याने हे कुटुंब चिंतेत सापडले असल्याने मागील बीलाचा नियमित भरणा ते करत होते मात्र आता नोव्हेंबर महिन्याचे बील अटळकर कुंटुबाला तब्बल दोन लाख बेचाळीस हजार चारशे दहा रुपये आहे त्यामुळे या वीज बीलाचा भरणा करायचा कसा असा गंभीर प्रश्न या कुटुंबा समोर पडलाय वीज महावितरण विभागाचा अजब गजब कारभारा विरोधात आपल्याला नेहमीच वीज ग्राहकांचा आक्रोश पहायला मिळतो या वीज महावितरण विभागाच्या अशा कारभाऱ्यामुळे ग्रामीण भागातील वीज ग्राहकांना मोठा अज्ञानपणाचा फायदा घेऊन वीज महावितरण विभागाकडून लुट केले जात आहे असे मत जनतेतून व्यक्त केल्या जात आहे

91 इंडिया न्युज नेटवर्क प्रतिनिधी विशाल भालेराव ईस्लापुर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad