Type Here to Get Search Results !

बोगस कॉल सेंटर चालवून नागरिकांची फसवणूक करणारी आंतरराज्य टोळी गजाआड



बोगस कॉल सेंटर चालवून नागरिकांची फसवणूक करणारी आंतरराज्य टोळी गजाआड, 03 आरोपीतांसह 2 लाख 49 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत...!!!


आजच्या आधुनिक युगात अन्न, वस्त्र आणि निवारा इतकीच मोबाईल सुध्दा आता माणसाची गरज बनली आहे. मोबाईलमुळे सर्व सामान्य लोकांचा बराचसा त्रास कमी झालेला आहे. मोबाईलद्वारे बरीचशी कामे नागरिक घरी बसल्या ऑनलाईन पद्धतीने करु शकतात. परंतु ऑनलाईन काम करीत असतांना बऱ्याचवेळा नागरिकांची फसवणूक देखील होत असते. अशाच एका बोगस कॉल सेंटरचा पर्दाफाश करुन नंदुरबार स्थानिक गुन्हे शाखेने 03 आरोपीतांना ताब्यात घेवून त्यांचेकडून 2 लाख 49 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केलेला आहे.


दिनांक 14/12/2022 रोजी नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री.पी. आर. पाटील यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की. अक्कलकुवा तालुक्यातील मोठी राजमोही गावात एका घरात गुजरात राज्यातील सुरत येथून आलेले काही तरुण राहात असून ते इन्स्टाग्राम या समाज माध्यमावर VIP मोबाईल नंबर विक्रीची जाहिरात करून ते नंबर विकत घेण्यासाठी फोन करणाऱ्या ग्राहकांना VIP मोबाईल नंबर देण्याचे अमिष दाखवून त्यांचेकडून फोन पे, गुगल पे, पेटीएम किंवा इतर माध्यमातून पैसे घेवून त्यांना कोणत्याही प्रकारचे VIP मोबाईल नंबर न देता त्यांची फसवणूक करीत आहेत. अशी बातमी मिळाल्याने त्यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. किरणकुमार खेडकर यांना कळवून स्थानिक गुन्हे शाखेचे एक पथक तयार करुन बातमीची खात्री करून तात्काळ संशयीत इसमास ताब्यात घेवून योग्य ती कारवाई करण्याचे आदेश दिले.


स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अक्कलकुवा तालुक्यातील मोठी राजमोही गावात जावून मिळालेल्या बातमीप्रमाणे माहिती घेतली असता, जावीद निजामोद्दीन मक्राणी याचे घरात गुजराज राज्यातील सुरत येथून दोन • इसम आलेले असून त्यांच्या मदतीला गावातीलच एक इसम असल्याचे निष्पन्न झाले.


स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मोठी राजमोही गावात जावीद निजामोद्दीन मक्राणी याचे घरी जावून त्यास आवाज देवून घराबाहेर बोलाविले. जावीद यास सुरत येथून आलेले तरुण कोठे आहेत ? असे विचारले असता, त्याने ते घराच्या छतावर त्यांचे ऑनलाईन काम करीत असल्याचे सांगितले. त्यावरून पथकाने जावोद मक्राणी याचे घराचे छतावर तीन तरुण खाली बसून मोबाईलवर काही तरी करतांना दिसल्याने त्यांना ताब्यात घेतले. ताब्यात घेतलेल्यांना त्यांचे नाव गाव विचारले असता त्यांनी ।) यासीन रईस मक्राणी वय 19 रा. घर नंबर-302, अल रहेमत अपार्टमेंट, कॉझवे सर्कल, रांदेर सुरत ह.मु. मोठी राजमोही ता. अक्कलकुवा जि. नंदुरबार 2) एजाज मोदीन मक्राणी वय 25, रा. मोठी राजमोही ता. अक्कलकुवा जि. नंदुरबार 3) यशराज विजयसिंह महिदा वय- 25, रा. 301 - ए. भूमी कॉम्प्लेक्स, हनीपार्क रोड, सुरत असे सांगितले, ताब्यात घेतलेल्या संशयीतांकडून 2 लाख49 हजार रुपये किमतीचे 05 विविध कंपनीचे महागडे मोबाईल, सिम कार्ड, डेबिट कार्ड इत्यादी साहित्य कायदेशीर कारवाई करुन जप्त करण्यात आले.


ताब्यात घेतलेल्या संशयीतांना विचारपूस केली असता, त्यांनी अतिशय धक्कादायक अशी माहिती सांगितली की, त्याचेकडील मोबाईलवर इन्स्टाग्राम या समाज माध्यमावर VIP मोबाईल नंबर विक्रीची जाहिरात करुन ते नंबर विकत घेण्यासाठी फोन करणाऱ्या ग्राहकांना VII मोबाईल नंबर देण्याचे अमिष दाखवून त्यांचेकडून बँक अकाऊंटवर पैसे स्वीकारून ग्राहकांना कोणत्याही प्रकारचा VIP नंबर न देता ग्राहकाची आर्थिक फसवणूक करीत होतो बाबत सांगितले. त्यानंतर त्यांना त्यांच्या शिक्षणाबाबत विचारपूस केली असता यशराज महिदा हा डिप्लोमा इंजिनिअर असून यासीन हा इयत्ता 10 त्री तर एजाज हा फक्त इयत्ता 9 वी पास असल्याचा धक्कादायक खुलासा त्यांनी केला. ताब्यात घेतलेल्या तिन्ही आरोपीतांविरुध्द अक्कलकुवा पोलीस ठाणे येथे भारतीय दंड संहिता कलम 420 व माहिती तंत्रज्ञान अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात येवून त्यांना गुन्ह्याच्या पुढील तपासकामी अक्कलकुवा पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.


ताब्यात घेतलेल्या तिन्ही आरोपीतांनी मागील 5 ते 6 महिन्याच्या कालावधीत भारतातील कर्नाटक, केरळ, आंध्रप्रदेश, पंजाब इत्यादी राज्यांमधील नागरिकांची VIP मोबाईल नंबर देण्याचे अमिष दाखवून फसवणूक केली असल्याचे सांगितले. सदर गुन्ह्याची व्याप्ती खूप मोठी असून गुन्ह्याच्या मुळापर्यंत जावून गुन्ह्यात सहभाग असणाऱ्यांना लवकरच ताब्यात घेवून त्यांचेवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल व कोणाचीही गय केली जाणार नाही व तिघांनी अशाप्रकारे अनेकांना फसविल्याची शक्यता असून त्यादृष्टीने देखील तपास करण्यात येईल असे नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री. पी. आर. पाटील यांनी सांगितले.


सदरची कारवाई नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री. पी. आर. पाटील, अपर पोलीस अधीक्षक श्री. निलेश तांबे, अक्कलकुवा विभागाचे उप विभागीय पोलीस अधिकारी श्री. संभाजी सावंत यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. किरणकुमार खेडकर, सहा. पोलीस निरीक्षक श्री. संदीप पाटील, पोलीस हवालदार सजन वाघ, मुकेश तावडे, पोलीस नाईक मनोज नाईक. बापु बागुल, विशाल नागरे, जितेंद्र अहिरराव, दादाभाई मासुळ, मोहन ढमढेरे, पंकज महाले, हितेश पाटील, तृषार पाटील, दिपक न्हावी, राजेंद्र काटके, शोएब शेख पथकाने केली असुन नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री. पी. आर. पाटील यांनी पथकाचे अभिनंदन केले आहे.


नंदुरबार जिल्ह्यातील नागरीकांना आवाहन करण्यात येते की, ऑनलाईन शॉपींग साईटवरुन कोणत्याही अमीषाला बळी पडु नये, अनोळखी व्यक्तीच्या बँक अकाऊंटमध्ये किंवा पेटीएम द्वारे खात्री केल्याशिवाय कोणताही आर्थिक व्यावहार करु नये जेणे करुन आपली कोणत्याही प्रकारची आर्थिक फसवणूक होणार नाही, अशा प्रकारचे कॉल आल्यास किंवा फसवणूकक झाल्यास तात्काळ नजीकच्या पोलीस ठाण्यास समक्ष जावुन संपर्क साधावा. असे आवाहन पोलीस अधीक्षक

पी. आर. पाटील , नंदुरबार यांनी केले आहे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

All Time Hi News