Type Here to Get Search Results !

पंढरपूर येथील हटकर समाज मठ्ठ विकु देणार नाही:भिमराव भुसनर पाटील



  पंढरपूर येथील हटकर समाज मठ्ठ विकु देणार नाही:भिमराव भुसनर पाटील


 हटकर समाजाची अस्मिता असलेला पंढरपूर येथील हटकर मठाच्या विकासासाठी प्रयत्न न करता मीच मठाचा मालक असल्याचा रुबाब दाखवुन   गाळ्याच्या भाडे वर पोट भागेना म्हणून स्वयंघोषीत अध्यक्ष आणि संचालक मंडळाने चक्क मठ्ठचं विकायला काढलेला आहे. वास्तविक पाहता लोकनेते स्वर्गीय शामराव पाटील व सहकारी यांनी संपूर्ण महाराष्ट्रातील समाज बांधवां कडुन वर्गणी गोळा करून पंढरपूर येथे हटकर समाजाचा मठ्ठ बांधला.पण हुशारकीने जवळ चे नातेवाईकांना सदस्य करून सगळा मलिदा हडपण्याचे पाप स्वयंघोषीत अध्यक्ष ने केले  कालांतराने आपल्या समाजातील एका पुढारीने मी हटकर समाजाचा नेता म्हणून राजकीय नेते मंडळीं बरोबर राहुन आजपर्यंत जेवढा भष्ट्राचार करता येईल तेवढा केला. त्या गड्यानं आजपर्यंत मठाच्या बैठकीचे निमंत्रण समाज बांधवांना न देता जवळचे नातेवाईकांना बरोबर घेऊन मठ्ठ स्वतःच्या मालकीचा असल्या सारखं वातावरण तयार केले. संपूर्ण महाराष्ट्रातील हटकर समाजातील सांप्रदायिक बांधव दर महिन्याला पंढरपूर च्या  पांडुरंगाचे दर्शन घेऊन  अभिमानाने आपल्या मठात विश्रांती साठी येतात.सध्या बाजार भावा प्रमाणे हटकर मठाची किमंत चार कोटी रूपये आहे. सध्याचे हटकर मठाचे स्वंयंम घोषीत अध्यक्ष आणि  संचालक मंडळाने हि जागा विकुन वाखरी येथे जागा घेण्यासाठी चर्चा करून व्यवहारा साठी बैठका सुरू केल्या आहेत. एवढा मोठा निर्णय घेताना समाजातील एकाही बांधवांना सांगितले नाही.किंवा समाजाची असणारे गाव येथे जाऊन समाज बांधवांशी चर्चा करण्याचा प्रयत्न केला नाही.

तरी महाराष्ट्रा तील सर्व समाज बांधवांनी सावध होऊन विरोध केला पाहिजे. आपल्या समाजातील कारखाना संचालक, कृषी उत्पन्न समिती संचालक, युवा नेते मंडळीनी विरोध केला पाहिजे.समाजातील आजी माजी सरपंच सोसायटी चेअरमन यांनी ठामपणे विरोध केला पाहिजे हटकर समाज महासंघाचे पदाधिकारी प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हाधिकारी यांना भेटुन निवेदनं देऊन संचालक मंडळावर कारवाई करण्यात यावी म्हणून प्रयत्न करतील.जो समाज बांधव त्या व्यवहारात सह्या करेल तो दोषी असेल. जिल्ह्यातील आमदार,खासदार,पालकमंत्री यांना भेटुन निवेदनं देऊ.वेळ आली तर आझाद मैदानावर उपोषणाला बसु पण हटकर समाजाची अस्मिता असणारा हटकर मठ्ठ विकु देणार नाही..

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad