Type Here to Get Search Results !

संगणक परिचालक संघटना पालघर यांना कर्मचारी दर्जा देवून मासिक वेतनाची मागणी.



संगणक परिचालक संघटना पालघर यांना कर्मचारी दर्जा देवून मासिक वेतनाची मागणी.


पालघर जिल्हा प्रतिनिधी: सुनिल जाबर


      संगणक परिचालक संघटना ही राज्यात सुमारे २१ हजार ग्रामपंचायती ,३५१ पंचायत समिती व ३४ जिल्हा परिषद कार्यालयामध्ये संग्राम व आपले सरकार सेवा केंद्राच्या माध्यमातून राज्यातील तरुण तरुणी असलेले संगणक परिचालक मागील १० वर्षापासून काम करत असून यामधील कर्मचाऱ्यांना मासिक मानधन ६९३० रुपये मिळत आहे यात या महागाईच्या काळात त्या संगणक परीचालकांचे कुटंब कसे चालवायचे ? हा प्रश्न आहे त्या निमित्ताने विक्रमगड विधानसभाचे मतदार संघाचे मा .आमदार सुनिलजी भुसारा साहेब यांना निवेदन दिले.

    या मागील २९ नोव्हेंबर २०१८ रोजी राज्याचे माजी मुख्यमंत्री मा.उद्धवजी ठाकरे साहेब यांनी प्रश्न सोडविण्याचे वचन आझाद मैदानावर येवून दिलेले होते त्याचबरोबर राज्याचे माजी उमुख्यमंत्री मा.अजितदादा पवार साहेब यांनी सुद्धा आश्वासन दिले होते परंतु अजून सुद्धा परिस्थिती आहे तीच बघायला मिळत आहे .१८ सप्टेंबर २०१९ रोजी शासनाचे आपले सरकार प्रकल्पातील सर्व संगणक परिचालकांना महाराष्ट्र आय टी महामंडळाकडून नियुक्ती देण्याचा ठराव घेतले परंतु त्या वेळेस निधीचा अडचण असल्यास सांगितले.परंतु ही कारणे आता बाजूला ठेवून आम्हाला आपले सरकार सेवा केंद्र प्रकल्पातील सर्व संगणक परिचालकांना महाराष्ट्र आय टी महामंडळाकडून कर्मचारी म्हणून नियुक्ती देवून राज्याच्या अर्थसंकल्पातून किमान मासिक वेतन देण्याची तरदुत करावी किंवा सुधारित आकृतीबंधानुसार सर्व संगणक परिचालकांना ग्रामपंचायत स्तरावर कर्मचारी दर्जा देवून राज्याच्या अर्थसंकल्पातून किमान मासिक वेतन तरतूद करावी .या कडे शासनाने प्रत्यक्ष लक्ष देवून आमची मागणी लवकरात लवकर पूर्ण करावी अशी संगणक परीचालकांची मागणी आहे.

   या प्रसंगी संगणक परिचालक संघटना चे तालुका उपाध्यक्ष अविनाश घाटाळ,तालुका सचिव नागेश खुरकुटे ,संदेश जाबर ,अजय , सिताराम गरेल व इतर सर्व संगणक परिचालक उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad