Type Here to Get Search Results !

.राजेश पाडवी यांच्या कै.कलावती फाउंडेशन सोमावल तालुका तळोदा यांच्यामार्फत पोलीस भरती मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन



शहादा तालुक्यातील लोणखेडा तालुका शहादा येथे अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या सरदार पटेल सभागृहात दिनांक 15 डिसेंबर रोजी आ.राजेश पाडवी यांच्या कै.कलावती फाउंडेशन सोमावल तालुका तळोदा यांच्यामार्फत पोलीस भरती मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.या मेळाव्याला सुमारे साडेअकराशे युवक व तरुण उपस्थित होते.

       



            याप्रसंगी आ.राजेश पाडवी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष मकरंद पाटील भाजपा जिल्हा महामंत्री जितेंद्र जमदाळे जळगाव येथील दर्जी फाउंडेशन चे संचालक गोपाळदर्जी माजी वरिष्ठ पोलीस अधिकारी अशोक बोरकर नंदुरबार येथील कौटिल्य फाउंडेशनचे प्रवीण पाटील नारायण ठाकरे विनोद जैन उपस्थित होते. प्रथम मान्यवरांच्या हस्ते कै.कलावती पाडवी यांच्या प्रतिमेचे पूजन करून पोलीस भरती मार्गदर्शन मेळाव्याच्या शुभारंभ करण्यात आला.




       उपस्थित युवक व तरुणांना स्वतः माजी पोलीस निरीक्षक व आमदार राजेश पाडवी माजी वरिष्ठ पोलीस अधिकारी अशोक बोरकर नंदुरबार येथील प्रवीण पाटील तसेच जळगाव येथील गोपाळ दर्जी यांनी मार्गदर्शन केले.सर्वच वक्त्यांनी पोलीस भरती बाबत परीक्षा देतांना परीक्षार्थींनी योग्य मार्गदर्शन घेऊन अभ्यासक्रमाची तयारी करावी.मागील प्रश्नपत्रिका त्याची स्वरूप पूर्णतः निरीक्षण करून परीक्षेची पूर्वतयारी करावी रणनीती करावी.परीक्षेला अगदी आनंदाने सामोरे केल्यास अपयश येत नाही असे मत मांडले.उपस्थित परीक्षार्थी तसेच युवकांनी प्रमुख वक्त्यांना परीक्षे संदर्भात माहिती विचारली.गोपाळ दर्जी यांनी पोलीस भरती बाबत अभ्यासपूर्ण सखोल माहिती दिली.सकाळी दहा ते दुपारी चार वाजेपर्यंत मार्गदर्शन मेळावा घेण्यात आला.




       याच मेळाव्यात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते आमदार राजेश पाडवी लिखित पोलीस भरती बाबत मार्गदर्शन पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले व उपस्थित युवकांना मोफत वाटप करण्यात आले.या मेळाव्याला माजी नगरसेवक डॉक्टर योगेश चौधरी भाजपा आदिवासी आघाडीचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मीकांत वसावे आ.राजेश पाडवी यांचे स्वीस सहाय्यक हेमराज पवार प्रा.मेहमूद पिंजारी,सचिन पावरा, गोपाल गागुर्डे, कमल पावरा, आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad