Type Here to Get Search Results !

चंद्रकांत पाटील महापुरुषांना बद्दल केलेल्या अवमान जनक वक्तव्यासाठी राजीनामा आणि त्यांच्यावर मानसिक उपचार करवण्याची मागणी - बहुजन समाज पार्टी ठाणे



चंद्रकांत पाटील यांच्या महापुरुषांना बद्दल केलेल्या अवमान जनक वक्तव्यासाठी राजीनामा आणि त्यांच्यावर मानसिक उपचार करवण्याची मागणी पत्र


राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांबद्दल केलेल्या अवमान जनक वक्तव्याने बहुजनांच्या भावनात दुखावल्या गेल्या आहेत पाटील यांनी तात्काळ बहुजनांची माफी सहित मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा अशी बहुजन समाज पार्टी ठाणे जिल्हाच्या वतीने मागणी आहे.




महाराष्ट्र हा केवळ फुले शाहू आंबेडकर आणि कर्मवीरांच्या पुरोगामी विचारांमुळे शिक्षित आणि पुढारला आहे. बहुजनांना शिक्षणाचा अधिकार मिळवून देण्यासाठी या महापुरुषांचा त्याग आणि कष्टाची तुलना अशक्यच आहे. वर्णव्यवस्थेच्या जोकडात अडकलेल्या समाजाला, स्त्रियांना स्वातंत्र्य मिळवून देत फुले आंबेडकरांनी शिक्षणाची दारे उघड केली अशा केवळ वैचारिक अज्ञानामुळे आणि डोक्यातील बहुजनाबद्दल असलेल्या तिरस्कार यामुळे उच्च व तंत्र शिक्षण मंत्र्यांनी त्यांच्या अकलेचे तारे तोडले आहेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वैचारिक चौकटीतून बाहेर येऊन त्यांनी या महापुरुषांचा जवळून अभ्यास करावा असे आवाहन देखील मा. संतोषजी भालेराव यांनी केले.


पाटील यांना भीकेत मंत्री पद मिळाले आहे. कुठलेही कर्तृत्व नसताना नेतृत्व कौशल्याचा अभाव असलेल्या पाटील यांना भाजपने स्थान दिले आहे भाजप पक्षश्रेष्ठींनी त्यांच्यावर आवर घालावी. यापूर्वी देखील महिलांबद्दल अपमान कारक वक्तव्य केले होते अशा भुरसडलेल्या विचारांनी माखलेल्या पाटील यांच्याकडून मुख्यमंत्री यांनी राजीनामा घ्यावा तसेच अशा व्यक्ती च्या संभाषणामुळे समाजात तेढ निर्माण होण्याची शक्यता आहे आणि सामाजिक शांतता व सुरक्षितता भंग होऊ शकते यासाठी त्यांच्यावर ठाणे मनोरुग्णालयात मानसिक उपचार करावे अशी मागणी बहुजन समाज पार्टी ठाणे जिल्ह्याच्या वतीने करण्यात आली 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad