जव्हार महाविद्यालयातील निवासी श्रमसंस्कार शिबिरात व्यसनमुक्ती या विषयावर मार्गदर्शन संपन्न
पालघर जिल्हा प्रतिनिधी:- सुनिल जाबर .
दिनांक २५ डिसेंबर २०२२ रोजी गोखले एज्युकेशन सोसायटीचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय येथील राष्ट्रीय सेवा योजनेच्या निवासी शिबिरात " तरूण पिढीचा नशेपासून बचाव या विषयावर मार्गदर्शन आणि पोस्टर प्रदर्शन चे" दत्त मंदिर, नांगरमोडा, तालुका जव्हार, जिल्हा पालघर येथे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमास नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य चे पालघर जिल्हा संघटक मिलिंद रूपचंद पाटील प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थितांना मार्गदर्शन केले.
मिलिंद पाटील यांनी मार्गदर्शनाची सुरूवात व्यसनमुक्ती ची शपथ देऊन करण्यात आली तसेच व्यसनांमुळे माणसास शारीरिक, मानसिक व सामाजिक दुष्परिणामांना तोंड द्यावे लागते ( दारू, गुटखा, तंबाखू, सेगरट, अमली पदार्थ ) चे सेवन व त्यांचे दुष्परिणाम या विषयावर मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात येते. तंबाखू च्या सेवनाच्या चक्र व्यूहातून तरूण पिढीला बाहेर काढून, निकोटीन व तंबाखू च्या व्यसनापासून प्रतिबंध करणे.
देशात प्रत्येक १६ सेकंदाला एक मूल तंबाखूचे पहिल्यांदा सेवन करतो तर दर दिवशी हा आकडा ५५०० मुलांपर्यंत जाते. तंबाखूविरोधी मानसिकता निर्माण करणे, तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांच्या व्यसनांचा समाजावर मोठा परिणाम होत आहे. अनेकांना कर्करोगासारख्या आजारांना सामोरे जावे लागत आहे. असे सांगण्यात आले आहे. सदर शिबीर गोखले एज्युकेशन सोसायटीचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम. आर. मेश्राम यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात येत असून यावेळी राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ. अविनाश अडसूळ, प्रा.अनंत आवळे, प्रा. मंगेश भले, व प्रा. सुधीर भोईर प्रा. प्रवीण नडगे, प्राध्यापिका ऋतुजा पाटील, राजेश कोरडा सर,पत्रकार संरक्षण समिती पालघर जिल्हाध्यक्ष मनोज कामडी,व तसेच राष्ट्रीय सेवा योजनेचे १३५ विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रम चे सुत्रसंचलन अंजली तायडे, अजय पवार यांनी केली .