महापरिनिर्वाण दिनानिमित्त कोठार आश्रमशाळा येथे अभिवादन
अनंत ज्ञानदीप आश्रम शाळा कोठार येथे भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले. अध्यक्षस्थानी प्राथमिक मुख्याध्यापक डी टी पाटील होते.मुख्य अतिथी म्हणून माध्यमिक मुख्याध्यापक सी एम पाटील मंचावर उपस्थित होते. सुरुवातीला डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
याप्रसंगी शाळेचे ज्येष्ठ शिक्षक हरी भारती, शालिग्राम वाणी, हंसराज महाले यांनी विद्यार्थ्याना बाबसाहेबांच्या जीवन कार्याविषयी मार्गदर्शन केले.या प्रसंगी शंकर मुठाळ,योगेश चव्हाण, भूषण येवले,जयवंत मराठे, पन्नालाल पावरा,नीता गुरव,निंबा रावळे, ब्रम्हराज नाईक, दिपक मालपुरे,आदींसह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.